Breaking News

5G च्या नावाने फसवणूक, तुम्हालाही ‘हा’ मेसेज आल्यास सावधान

विश्व भारत ऑनलाईन :

देशात 5G सेवा सुरु झाली.या सेवेची घोषणा होताच एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्यांनी निवडक शहरांमध्ये 5G सेवेला सुरुवात केली आहे. यानंतर ग्राहकांची देखील स्मार्टफोनमध्ये 5G सेवा सुरु करण्याची लगबग सुरु झाली.या संधीचा फायदा घेत काही सायबर चोरट्यांनी फेक मेसेज पाठवत, ग्राहकांना गंडा घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुम्हालाही असे मेसेज येत असतील तर वेळीच सावध व्हा…

अनेक शहरांमध्ये पोलिस विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जर कोणी तुम्हाला 5G सेवा सुरु करण्यासाठी तुमची खाजगी माहिती विचारत असेल, तर सावध व्हा आणि तुमची माहिती अजिबात शेअर करू नका.

फेक लिंक पाठवून फसवणूक

हैदराबाद पोलिसांनी ट्विट करून नागरीकांना आवाहन केले आहे की, “सायबर घोटाळेबाज 5G च्या नावाने लिंक पाठवत आहेत. जर तुम्ही या लिंक्स उघडल्या तर तुमचा फोन हॅक होण्याचा धोका आहे. सिम 5G वर अपग्रेड करावे असे मेसेज आणि लिंक पाठवून ग्राहकांना गंडा घातला जातोय.

पोलिसांचे आवाहन

नवीन तंत्रज्ञानामुळे घोटाळ्याचे नवीन प्रकार झपाट्याने वाढले आहेत. सिम 5G मध्ये कनवर्ट करण्याच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तुमच्‍या शहरात 5G सेवा उपलब्‍ध असले तरीही, तुम्‍हाला वैयक्तिक किंवा बँकिंग तपशील कोणाशीही शेअर करण्‍याची गरज नाही, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

चुका टाळा

तुम्हाला जर 5G सेवेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्याकडे 5G फोन असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुम्हाला तुमचे सिम अपग्रेड करण्याची गरज नाही. तुमच्या फोनवर 5G अपग्रेडशी संबंधित कोणतीही लिंक आली तर त्यावर क्लिक करू नका. दूरसंचार ऑपरेटरकडून येणार्‍या कॉलवर अवलंबून राहण्याची देखील चूक करू नका. तसेच कोणत्याही परिस्थितीत OTP किंवा बँक तपशील यांसारखी माहिती शेअर करू स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.

About विश्व भारत

Check Also

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा!

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार। भारत …

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *