शेतकरी चिंतेत : संत्रा,मोसंबी,लिंबूवर ग्रीनिंग रोगाचा प्रादुर्भाव

विश्व भारत ऑनलाईन :
संत्रा, मोसंबी, लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्रीनिंग जातीच्या रोगाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

अकोला कृषी विद्यापीठाने यावर आवाहन केले आहे. ग्रीनिंग हा सार्वत्रिक म्हणजे जिथे फळबाग लागवड केली जातेय, त्या भागात हा रोग आढळून येतो.अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील अचलपूर सारख्या भागात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला आहे.विदर्भातील अनेक भागात ग्रीनिंग अथवा मंदर्हास या रोगाचा प्रकोप दिसून येत आहे. दिवसेंदिवस रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगामुळे लिंबूवर्गीय फळांच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. ग्रीनिंग मुळे झाडांना कमी आणि लहान आकाराचे फळ लागतात, तसेच झाड पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असते.

उपाययोजना
✳️ एखाद्या फांदीमध्ये ग्रीनिंगची लक्षणे दिसल्यास तात्काळ तेवढी फांदी नष्ट करावी. जेणेकरून या जीवाणूची हालचाल झाडामध्ये संथ गतीने होते. मात्र अधिक प्रमाणात (५० टक्के पेक्षा अधिक) प्रकोप असल्यास बाधित झाडे मुळासकट काढून जाळून नष्ट करावीत. फांद्या छाटणी करताना उपयोगात आणलेले अवजारे १ टक्का सोडियम हायपोक्लोराईड द्रावणाने निर्जंतुक करावी.

About विश्व भारत

Check Also

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका

राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *