Breaking News

शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद? पोलीस बदली प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन :
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एकमत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिस बदल्यांवरुन शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद झाल्याचे कळते.

रविवारी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली मुद्यावर जवळपास दोन तास खलबत करुनही दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले नसल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा आहे.

रविवारी दिवसभरातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत कार्यक्रम असताना देखील ते या कार्यक्रमांना एकत्र आले नव्हते. तेव्हापासून या दोघांमध्ये काही बिनसल्याच्या चर्चांना उधाण आले.

राज्यातील पोलिस भरती हा राज्याच्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा आहे. महाविकास आघाडीच्या काळातही याच मुद्यावरुन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद झाले होते.

About विश्व भारत

Check Also

2008 में सोनिया गांधी ने वापस लिए थे जवाहरलाल नेहरू से जुड़े लेटर

2008 में सोनिया गांधी ने वापस लिए थे जवाहरलाल नेहरू से जुड़े लेटर   टेकचंद्र …

BJP आमदाराच्या कंपनीकडून मुद्रांक शुल्क चोरी

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार, नोंदणी आवश्यक नसलेल्या दस्तावेजांवर मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असतानाही तो चुकविण्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *