विश्व भारत ऑनलाईन :
दिवाळसणाची आज वसुबारसने सुरुवात झाली. दिवाळीचा आज पहिला दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत गाईचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे.
गायींचा सांभाळ
जवळपास सगळ्याच गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, गोबर गॅस, पंचगव्य, दूध, तुपापासून मिठाईसह औषधीपर्यंत वापर केला जातो.
भारतीय वंशाचे गोधन
यात डांगी, देवणी, गीर, खिल्लारी, थारपरकर, कांकरेज, साहिवाल, लाल कंधारी व अमृतमहल अशा जाती आहेत. पैकी डांगी, देवणी, खिल्लारी व लाल कंधारी या राज्यातील ४ जाती आहेत.
विश्वभारत News Website