विश्व भारत ऑनलाईन :
प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नुकताच ‘कौन बनेगा करोडपती 14’ या क्विझ शोच्या सेटवर अपघात झाला. त्यांच्या पायाची नस कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत अजूनही गंभीर असल्याचे कळते.दुखापतीनंतर त्यांच्या पायाला काही टाके पडले असून आता काळजी करण्यासारखे काही नाही. ते पूर्णपणे बरे आहेत.
धातूच्या धारदार वस्तूमुळे त्यांच्या डाव्या पायाच्या मागच्या बाजूची नस कापली गेली. त्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्याच्या पायाला टाके पडले. त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असली तरी डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनी बिग बींना त्यांच्या पायावर ढकलण्यास किंवा चालण्यास मनाई केली आहे. त्यांना ट्रेडमिलवर चालताही येत नाही.
अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस कापली गेल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले आहे. याबाबत स्वतः बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमधून खुलासा केला आहे. आपल्या पायाची नस कापली गेल्याने जखमेला टाके घालण्यात आले आहेत. आता आपण पूर्णपणे बरे झालो असून काळजीचे कोणतीही कारण नाही, अशी माहिती बच्चन यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे.