विश्व भारत ऑनलाईन :
टी२० विश्वचषकाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबल्याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. यात शेवटच्या बॉलवर भारताने पाकिस्तानला हरविले आहे. मेलबर्नमध्ये रविवारी (२३ ऑक्टोबर) भारतीय संघाने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मांचा हा निर्णय सार्थ ठरवत अर्शदीप सिंगने पहिल्या षटकात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर दुसऱ्या षटकात शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिजवानला माघारी धाडले. त्याला हार्दिक पांड्याची देखील साथ मिळाली. अष्टपैलू पांड्याने तीन गडी बाद करत टीम इंडियाला सामन्यात परत आणले. शान मसूद आणि इफ्तिखार अहमद या दोघांनी अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या धावसंख्येत मोलाचा वाटा उचलला.

टी२० विश्वचषक : भारताने पाकिस्तानला धूळ चारली
Advertisements
Advertisements
Advertisements