Breaking News

तुमचं आवडतं ‘व्हॉट्सॲप’ होणार बंद…पण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
व्हॉट्सॲप हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. मात्र व्हॉट्सॲप अनेक डिव्हाइसमधून बंद होणार आहे. व्हॉट्सॲप वापरण्यासाठी डिव्हाइस बदलण्याची आवश्यकता आहे का? याबद्दल व्हॉट्सॲपने माहिती दिली आहे.

Advertisements

कंपनीकडून अधिकृत माहिती दिली आहे. व्हॉट्सॲपने सांगितले की, जुन्या आयफोनमधील व्हॉट्सॲप बंद होणार आहे. शिवाय जुन्या iOS वर चालणाऱ्या iPhone वापरकर्त्यांना व्हॉट्सॲप सुरू ठेवण्यासाठी iOS अपडेट करावे लागणार आहे.

Advertisements

व्हॉट्सॲप 24 ऑक्टोबरपासून iOS 10 आणि iOS 11 याही डिव्हाइसवर बंद होईल. त्‍यामुळे उद्यापासून या डिव्हाइसवर व्हॉट्सॲप काम करणार नाही. म्हणजेच तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करावा लागेल. कंपनीने iPhone 5 आणि iPhone 5s ला याबाबत सूचना दिल्या आहेत. या फोन वापरकर्त्यांना सांगण्यात आले आहे की व्हॉट्सॲप लवकरच त्यांच्या फोनवर काम करणे बंद करेल.

iPhone अजूनही iOS 10 आणि iOS 11 वर काम करत असल्यास ते अपडेट करावे. कंपनीने iOS 16 रिलीज केला आहे. तसेच नविन iPhones iOS 16 वर सुरू आहे. या आयफोन किंवा अँड्रॉइड वापरकर्त्यांचे व्हॉट्सॲप सुरू राहणार आहे.

व्हाट्सअँपने काय सांगितले?

व्हॉट्सॲपने म्हटले आहे की, सिस्टममधून व्हॉट्सॲप बंद होण्यापूर्वी व्हॉट्सॲपबाबत सूचना देण्यात आल्‍या आहेत. हे अपग्रेड करण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. त्यामुळे बंद होण्यापूर्वी iOS अपडेट कारावे,असे व्हॉट्सॲपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

साल 2024 में 12 महीने की 12 बड़ी भविष्यवाणी?जनवरी से दिसंबर तक हो सकती हैं ये बड़ी घटनाएं

साल2024 में 12 महीने की 12 बड़ी भविष्यवाणी?जनवरी से दिसंबर तक हो सकती हैं ये …

साल 2024 को लेकर डरावनी बडी भविष्यवाणी? नया साल मचाएगा तबाही,भूकंप और अकाल

साल 2024 को लेकर डरावनी बडी भविष्यवाणी? नया साल मचाएगा तबाही,भूकंप और अकाल टेकचंद्र सनोडिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *