Breaking News

शेतकरी सुखावला : अखेर पावसाने घेतली माघार

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
जून ते सप्टेंबर पाऊस चांगलाच बरसला. शेतकऱ्यांचे तर अतोनात नुकसान केले. परतीच्या पावसानेही शेतकऱ्यांवर दया मया दाखविली नाही. मागच्या चार महिन्यांपासून राज्यात मान्सूनने धुमाकूळ घातलाय.

Advertisements

परतीच्या पावसानेही राज्यातील विविध भागात पाऊस सुरू होता. मात्र, आता मान्सूनचा परतीचा प्रवास थांबणार, अशी माहिती हवामान खात्याने दिली होती. कालपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. राज्यात थंडीची चाहूल लागली आहे.

Advertisements

संपूर्ण राज्यातून ओलावा कमी होणे म्हणजेच आपल्या राज्यातून 2022 च्या मान्सूनच्या समाप्तीचे प्रतीक आहे. अशी घोषणा रविवारी हवामान विभागाने केली.त्यामुळे मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यात (दि.28) ऑक्टोबर पर्यंत सर्वत्र कोरडे वातावरण राहील, असा अंदाज आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

फळपीक विमा योजनेत बोगस अर्ज : काय आहे प्रकरण?

लागवड न करताच सुमारे साडेदहा हजार शेतकऱ्यांनी फळपिक विम्यासाठी अर्ज केल्यामुळे कृषी विभागाची झोप उडाली …

नागपुरात पावसाचा अंदाज!कांदा, धान, मका

राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थंडी कमी झाली आहे. 6 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *