Breaking News

अपघात,अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा नरक चतुर्दशीला यमतर्पण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
दीपोत्सवातील धनत्रयोदशी नंतर येणाऱ्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. या दिवशीपासून अभ्यंग स्नान करायला सुरुवात होते. याशिवाय या दिवशी यमतर्पण करण्याचेही महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण केले जाते.

Advertisements

आख्यायिका

Advertisements

धार्मिक मान्यतेनुसार, नरकासुराने 16 हजार 108 राजकुमारींना आपल्या बंदीखान्यात डांबून ठेवले होते. हा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी या नरकासुराचा वध आश्विन कृष्ण चतुर्दशीला करून स्त्रियांची मुक्तता केली. युद्धातील पराजयानंतर मृत्युसमयी नरकासुराला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.

अभ्यंग स्नान आणि आरोग्य

याशिवाय अभ्यंग स्नानाचे शास्त्रीय आणि आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे. शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करतो. यादिवसापासून साधारणपण थंडीची चाहूल लागते. वातावरणात बदल होतात. त्यामुळे त्वचा कोरडी पडायला लागते. आदी त्वचेशी संबंधित त्रास होऊ नये. म्हणून आरोग्यदायी अभ्यंग स्नान करण्याची पद्धत नरक चतुर्दशी पासून सुरू होते. ती पुढे येणाऱ्या थंडी संपेपर्यंत केले जाते.

अभ्यंग स्नानाचे आरोग्यासाठी फायदे

नरक चतुर्दशी रविवारी की सोमवारी?

हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.04 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:28 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 24 ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी साजरी केली जाईल.

अकाल मृत्यू टाळण्यासाठी करा यमतर्पण

धार्मिक मान्यतेप्रमाणे या दिवशी अकाल मृत्यू टाळण्यासाठी यमतर्पण करायचे असते. दाते पंचांग यांनी यमतर्पणाविषयी माहिती दिली आहे. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात वेगाने चालविल्या जाणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचे भय वाढले आहे. अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढतो. त्यामुळे नरकचतुर्दशीला यमतर्पण करून अपमृत्यू निवारणासाठी यमाची प्रार्थना सर्वांनी करणे आवश्यक आहे. अपमृत्यू येऊ नये म्हणून यमाला खालील 14 नावांनी तर्पण करून त्याची प्रार्थना करण्यास सांगितले आहे.

वडील हयात असलेल्यांनी पाण्यात अक्षता घालून व नसलेल्यांनी पाण्यात तीळ घालून खालील नावांनी तर्पण करावे.

1) यम 2) धर्मराज 3) मृत्यु 4) अंतक 5) वैवस्वत 6) काल 7) सर्वभूतक्षयकर 8) औदुंबर 9) दध्न 10) नील 11) परमेष्ठिन 12) वृकोदर 13) चित्र 14) चित्रगुप्त

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग: 340) ब्रह्मभोज कराने के नैसर्गिक लाभ

(भाग: 340) ब्रह्मभोज कराने के नैसर्गिक लाभ टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट वैदिक सनातन धर्म …

(भाग:339) साधू संत-मुनि महात्माओं को भोजन प्रसाद करवाने के नियम

(भाग:339) साधू संत-मुनि महात्माओं को भोजन प्रसाद करवाने के नियम टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *