Breaking News

सणासुदीत ऑनलाईन फसवणूक टाळा… या ‘स्टेप्स’ वापरा

विश्व भारत ऑनलाईन :
वेळेची कमतरता लक्षात घेऊन आणि पैशाची बचत व्हावी, या दृष्टीकोनातून ऑनलाईन खरेदीकडे कल वाढलाय. मात्र,सणासुदीच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाणही तितकेच वाढत आहे. तसेच पेमेंटसाठी ऑनलाईन मोडचा वापर केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग आणि UPI या विविध पर्यायांचा वापर केला जात आहे.

सणाच्या निमित्ताने अनेक कंपन्या विविध ऑफर्स देतात. आणि याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत असून फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. बनावट कंपन्यांच्या बनावट उत्पादनांच्या जाहिराती दिल्‍या जात आहेत. ज्यामध्ये अत्यंत कमी किंमतीत उत्पादने विकण्याचे आमिष दिले जाते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

अनोळखी लोकांपासून सावध

सोशल मीडियात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. अनोळखी व्यक्ती सोशल मीडिया अकाऊंटवरून तुमच्याशी आधी मैत्री करतात. त्‍यानंतर काही भेटवस्तू पाठवण्याविषयी मेसेजेस करतात. यामध्ये मौल्यवान भेट वस्‍तू पाठवत आहोत. थोडे पैसे भरावे लागेल. त्‍यानंतर कस्टम ऑफिसर बनून फोन केला जातो आणि ते सांगतात की कस्टम ड्युटी भरा. मग तो तुम्हाला कस्टम ड्युटीच्या नावाने त्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करायला लावतात, परंतु असे करू नये.

पासवर्ड बदलने आवश्यक

सोशल मीडियाच्या खात्याचा किंवा बँक खात्यांचा पासवर्ड वेळोवेळी बदलणे गरजेचे आहे. परंतु अनेक वेळा लोक सर्व प्रकारच्या खात्यांसाठी एकच पासवर्ड ठेवतात. परंतु तसे टाळले पाहिजे. असे केल्‍याने ऑनलाइन फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्‍यामुळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI पिन वेगळे ठेवावेत आणि काही दिवसांनी बदलत राहावे.

फ्री वायफाय, सायबर कॅफेचा वापर टाळा

लोक फ्री वाय-फाय वापरून ऑनलाईन व्यवहार केले जातात. पण, असले व्यवहार टाळले पाहिजे. या काळात तुमचे बँकिंग तपशील हॅक होण्याची जास्त शक्यता असते. सार्वजनिक सायबर कॅफेमध्ये जाऊन बँकिंगचे कोणतेही काम करू नये.

काही साइट सुरू करू नका

इंटरनेट वापरून कोणतीही वेबसाइट उघडू नये, जी असुरक्षित आहे. अशा साईट उघडून तुमची गोपनीय माहिती लीक होण्याची दाट शक्‍यता असते. याशिवाय ब्राउझर अनेक वेळा सावधानतेचा ईशारा देतोय. त्‍याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

About विश्व भारत

Check Also

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी   टेकचंद्र …

गौ हत्या के खिलाफ छिन्दवाडा में हिन्दुत्ववादी संगठनों का तीव्र निषेध

गौ हत्या के खिलाफ छिन्दवाडा में हिन्दुत्ववादी संगठनों का तीव्र निषेध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *