विश्व भारत ऑनलाईन :
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच मुंबईबाहेर जाणार आहेत. उद्या,रविवारी उद्धव ठाकरे औरंगाबादला भेट देणार आहेत. मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत कशी करता येईल याबाबतच्या चर्चेसाठी ते एकदिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनकडून (ठाकरे गट) देण्यात आली.
मराठवाड्यात 15 दिवसांपासून पावसानं धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेले पीक परतीच्या पावसामुळे पूर्ण भिजून, वाहून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पुराच्या पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. तरीही राज्यकर्ते राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता नाही,अशी जाहीर विधाने करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.