Breaking News

ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक पाकिस्तानचे ?समाजमाध्यमांवर दावा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
ऋषी सुनक यांच्या ब्रिटन पंतप्रधान निवडीत भारताची कोणतीही भूमिका नसतानाही ते भारतीय वंशाचे असल्याचा भारतीयांना अभिमान वाटत आहे. मात्र, पाकिस्तानचे नागरिकही यात सहभागी झाले आहेत. सुनक मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. सुनक यांच्या पैतृक घराण्यातील त्यांचे आजी-आजोबा ब्रिटिशकालीन भारतात जन्मले होते. त्यांचे जन्मस्थळ सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला हे आहे. त्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान पाकिस्तानचे असल्याचा दावा केला जात आहे. या संदर्भात पाकिस्तानकडून अद्याप कुठलेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.

Advertisements

सुनक यांच्या वंशाबाबत आतापर्यंत फार थोडा तपशील समाजमाध्यमांवर उपलब्ध आहे. मात्र, ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांत त्यांच्या पंतप्रधानपदी निवडीबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.सुनक हे सध्याच्या पाकिस्तानातील गुजरांवाला येथील एका पंजाबी खत्री कुटुंबातील आहेत. ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी १९३५ मध्ये नैरोबी येथे नोकरी मिळाल्याने गुजरांवाला सोडले.
त्यांची पत्नी सुहागरानी १९३७ ला केनियाला जाण्यापूर्वी आपल्या सासूंसमवेत गुजरांवाला येथून दिल्लीला गेल्या, असा दावा पाकिस्तान मध्ये केला जात आहे.ऋषी यांचा जन्म १९८० मध्ये साऊथहॅम्प्टन (इंग्लंड) येथे झाला. मात्र, ४२ वर्षीय सुनक यांच्याबाबत पाकिस्तानचे अधिकृत काहीही निवेदन नसले तरी समाजमाध्यमांवरील चर्चेत काही जणांनी पाकिस्तानच्या सरकारने सुनक हे मूळचे पाकिस्तानचे असल्याचा दावा करण्याची सूचना केली आहे. त्यांचे आजी-आजोबा गुजरांवालाचे होते. ते तेथून केनिया आणि नंतर ब्रिटनला गेले. हे एक मोठे यश आहे. एक पाकिस्तानी आता ब्रिटनमधील सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहे. तुमचा विश्वास असेल तर काहीही शक्य आहे.
परंतु इतर काही जणांनी सुचवले, की पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांना नव्या ब्रिटिश नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे. गुजरांवाला येथील पंजाबी ब्रिटनचा पंतप्रधान होईल, या आशेने आता अमेरिकेत माझ्या घरी झोपायला जात आहे. सुनक यांच्या निवडीचा भारत आणि पाकिस्तान दोघांनाही संयुक्तपणे अभिमान वाटला पाहिजे, असे एका नागरिकाने म्हटले आहे.गुजरांवाला पाकिस्तानात असल्याने, शंभर वर्षांपूर्वी ज्यांचे वंशज या शहराचे रहिवासी होते ते आज पाकिस्तानी आहेत.

Advertisements

कोहिनूर परत द्यावा

सुनक यांनी ‘कोहिनूर’ हा बहुमूल्य हिरा परत करावा. देण्यासंदर्भातील प्रलंबित मागणी पूर्ण करावी,अशी अपेक्षा आहे. सुनक पंतप्रधान झाले आहेत. पाकिस्तानने त्यांच्याकडे लाहोरमधून चोरीस गेलेला कोहिनूर हिरा परत करण्याची मागणी करावी, असे एकाने ट्वीट केले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

PM मोदीने चीनला सुनावले

भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यासाठी लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित गरजेची आहे, असे आवाहन …

ही बातमी महत्वाची : 8617321715, 9622262167 नंबर्सवरुन फोन, Whatsapp मेसेज आल्यास लगेच करा Block

पाकिस्तानने आता भारतामधील लष्करी शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.माहितीनुसार लष्करी शाळांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *