Breaking News

आता एक रुपयात खरेदी करा सोने…पण कसे?

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

डिजिटल सोन्यातली गुंतवणूक तुम्ही एक रुपयापासून सुरू करू शकता. अगदी घरबसल्या आरामात तुम्ही डिजिटल सोनं खरेदी किंवा विक्री करू शकता. यामुळे कोणत्याही अडचणींविना तुम्हाला तात्काळ पैसे मिळतात. बहुतांश प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आहे. या प्लॅटफॉर्म्सवरून तुम्ही एका क्लिकवर डिजिटल सोनं खरेदी करू शकता.

Advertisements

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणुकीसाठी तीन पद्धती उपलब्ध आहेत. सॉव्हरीन गोल्ड बॉंड हा त्यापैकीच एक होय. सॉव्हरीन गोल्ड बॉंड ही सरकार समर्थित सिक्युरिटी आहे. त्यांची किंमत सोन्याच्या वजनानुसार असते. यात एक ग्रॅम सोनं हे बॉंडच्या एक युनिटच्या बरोबरीचं असतं. या बॉंडमधली गुंतवणूक सोन्याच्या किमतीवर आधारित असते. या बॉंडची इश्यू किंमत खरेदीवेळी भरावी लागते. मॅच्युरिटीवेळी याची रक्कम रोखीने दिली जाते.

गोल्ड ईटीएफ भौतिक सोन्याचा वापर करून मोजलं जातं. हे कस्टोडियन बॅंकांच्या तिजोरीत ठेवलं जातं. मालमत्तेचं व्यवस्थापन करणारी कंपनी प्रत्येक युनिटला एक ग्रॅम सोन्याचं मूल्य कसं वाटप करण्याचा निर्णय घेते यावर ईटीएफच्या प्रत्येक युनिटचं मूल्य अवलंबून असतं.

गोल्ड फंड गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करतात. हा म्युच्युअल फंडसारखा एक प्रकार आहे. निव्वळ मालमत्ता मूल्य रोज ट्रेडिंगच्या शेवटी घोषित केलं जातं.

डॉलर आणि महागाईमुळे शेअर बाजार आणि रुपयावरचा वाढता दबाव यामुळे गुंतवणूकदारांनी आपला पैसा सोन्यात गुंतवण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या काळात सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. एकूण प्रत्यक्ष सोन्यात गुंतवणूक करण्यासोबत डिजिटल गोल्डमध्ये पैसे गुंतवण्याची पद्धत लोकप्रिय होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

२००० रुपयांची नोट घरबसल्या बदलता येणार काय?प्रक्रिया कोणती?

भारतीय रिझर्व्ह बँक ने १९ मे रोजी संध्याकाळी २००० रुपयांच्या नोटेबाबत मोठी घोषणा केली. घोषणेनंतर …

आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये 1024 मेंबर्स जोडता येणार ; वाचा नवे अपडेट्स

विश्व भारत ऑनलाईन : सर्वाधिक वापरले जाणारे लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवे अपडेट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *