भारत- पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याच्या दरात सोमवारी (१२ मे २०२५ रोजी) सकाळी बाजार उघडल्यानंतर मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. तर शेअर मार्केट हिरव्या रंगाची उधळण करीत असून तेजीत आहे.अक्षय तृतीयानंतर सोन्याचे दर चांगलेच वाढले होते. आता भारत- पाकिस्तान दरम्यान तणावजन्य स्थिती निवळत असतांना पून्हा सोन्याचे दर घसरले आहे. परंतु आताही ग्राहकांच्या मनात सोन्याच्या दराबाबत संभ्रम आहे.
जम्मू कश्मिर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले. त्यानंतर पाकिस्तानकडून भारतावर ड्रोनद्वारे हल्ले केले गेले. तर भारतीय सैन्याकडूनही त्याला सडेतोड उत्तर दिले गेले. त्यामुळे दोन्ही देशाच्या सिमेवर तणावजन्य स्थिती होती. हा तणाव वाढत असतांनाच दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केल्याचे जाहीर केले. त्यानंतर सोन्याच्या दरात चांगलीच घसरण होत असल्याचे बघायला मिळत आहे. या दराबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील सराफा बाजारात १० मे २०२५ रोजी दुपारी २ वाजता सोन्याचे दर मेकिंग आणि जीएसटी शुल्क वगळून प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी ९६ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९० हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७५ हजार ५०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६२ हजार ९०० रुपये नोंदवले गेले. हे दर शस्त्रसंधी नंतर सोमवारी नागपुरातील सराफा बाजार उघडल्यावर सकाळी १० वाजता २४ कॅरेटसाठी प्रति १० ग्राम ९४ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटसाठी ८८ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये नोंदवले गेले.
त्यामुळे नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर १० मे २०२५ रोजीच्या तुलनेत १२ मे २०२५ रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम २ हजार १०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ हजार ३०० रुपये, १४ कॅरेटसाठी १ हजार ३०० रुपये घसरल्याचे दिसत आहे. परंतु चांदीचे दर सोमवारी सकाळी १० वाजता ९६ हजार ९०० रुपरे प्रति किलो नोंदवले गेले. हे दर १० मे २०२५ रोजी ९६ हजार ९०० रुपये होते. तर प्लॅटिनम धातूचे दरही प्रति १० ग्राम ४४ हजार रुपये नोंदवले गेले.
मध्यंतरी सोन्याचे दर १ लाखावर…
नागपुरात २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्राम २४ कॅरेटसाठी जीएसटी आणि मेकिंग चार्ज वगळून ९९ हजार ४०० रुपयांवर गेले होते. दोन्ही शुल्क जोडल्यास हे दर प्रति दहा ग्राम १ लाख रुपयांवर होते.
विश्वभारत News Website