Breaking News

खरंच! सोन्या-चांदीचे दर कमी होणार

Advertisements

सुवर्ण बाजारपेठेत सातत्याने नवीन उच्चांक गाठणाऱ्या सोन्या–चांदीच्या दरांना अखेर मोठा ब्रेक लागला आहे. अवघ्या दोन दिवसांतच सोन्याचा भाव तब्बल १९ हजार रुपयांनी घसरला असून, चांदीच्या दरातही ९७ हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे. सोने–चांदीची विक्रमी दरवाढ आणि घसरण पाहता संभ्रमावस्था वाढली असून, दोन्ही धातुंचे दर यापुढील काळात आणखी घसरणार की वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Advertisements

 

सोने आणि चांदीने २९ जानेवारीला सर्वकालीन उच्चांक केला होता. मात्र, ज्या वेगाने दरवाढ झाली, त्याच वेगाने दोन्ही धातुंचे दर कोसळल्याने बाजारात एकच खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर दबाव वाढण्यामागे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदर धोरणाबाबत दिलेले संकेत तसेच डॉलर निर्देशांकातील वाढ ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. डॉलर मजबूत झाल्याने सोन्यातील गुंतवणूक तुलनेने कमी आकर्षण ठरल्यानंतर गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यामुळे सोने-चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. याचे तीव्र पडसाद देशांतर्गत बाजारातही उमटले आहेत. लग्नसराई आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर दरवाढीमुळे आधीच ग्राहक संभ्रमात होते. आता अचानक झालेल्या घसरणीमुळे खरेदीसाठी उत्सुकता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी बाजारातील अस्थिरतेमुळे अनेक ग्राहक आणि व्यापारी सावध भूमिका घेताना दिसत आहेत.

Advertisements

 

सुवर्ण तज्ज्ञांचे म्हणणे काय ?

सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या दरातील सध्याची घसरण तीव्र असली, तरी येत्या काही दिवसांत बाजाराची दिशा आंतरराष्ट्रीय घडामोडींवर दर अवलंबून राहणार आहे. सोन्या–चांदीच्या दरातील इतका तीव्र चढ-उतार कमी कालावधीत पाहायला मिळणे दुर्मिळ असून, गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय न घेता बाजारातील हालचालींचा अभ्यास करूनच पुढील पावले उचलावीत. जागतिक तसेच देशांतर्गत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सराफा बाजारात सध्या मोठी अस्थिरता पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी आणि जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला गेल्यास, भविष्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.

 

जळगावमध्ये आता काय स्थिती ?

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत २९ जानेवारीला २४ कॅरेट सोन्याच्या दराने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ८२ हजार ८२५ रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. त्यानंतरच्या दोन दिवसांत तब्बल १९ हजार ५५ रूपयांची जोरदार घसरण झाल्याने शनिवारपर्यंत सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६३ हजार ७७० रूपयांपर्यंत घसरले. दुसरीकडे, शहरात २९ जानेवारीला चांदीच्या दराने जीएसटीसह प्रति किलो चार लाख ६ हजार ८५० रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला होता. नंतरच्या दोन दिवसांत तब्बल ९७ हजार ८५० रूपयांची घसरण झाल्याने शनिवारपर्यंत चांदी जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ९ हजार रूपयांपर्यंत घसरली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

RBI की बड़ी घोषणा : मार्केट में जल्द आएंगे 20 के नए नोट

RBI की बड़ी घोषणा : मार्केट में जल्द आएंगे 20 के नए नोट टेकचंद्र सनोडिया …

शेअर मार्केटमध्ये तेजीत : सोन्याच्या दरात मोठी घसरण

भारत- पाकिस्तानदरम्यान शस्त्रसंधी झाल्यानंतर सोन्याच्या दरात सोमवारी (१२ मे २०२५ रोजी) सकाळी बाजार उघडल्यानंतर मोठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *