Breaking News

दोषी अधिकारी निलंबित : मंत्रालयात महिला अधिकाऱ्याचा विनयभंग प्रकरण

विश्व भारत ऑनलाईन :
शिंदे-फडणवीसांचे सरकार आहे, आपले सरकार आहे, महिलांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे दिसत आहे. सहकार खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करत त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेले आहेत.

तसेच हे सरकार महिलांचे रक्षण करणारे आहे. यामुळे आम्ही महिलांच्या पूर्णपणे बाजूने असल्याचे त्या म्हणाल्या. मंत्रालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला, दोन दिवसात चौकशी करून कारवाई करा असेही त्यांनी यावेळी सांगितेले आहे.

नेमके प्रकरण काय?

‘मी बोअर झालो आहे. मला जरा गाणे म्हणून दाखव’, असे म्हणत मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याचा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने विनयभंग केल्याची तक्रार नीलम गोऱ्हेंकडून करण्यात आली होती. कारवाईची मागणी मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याची नि:पक्षपातीपणाने चौकशी व्हावी यासाठी त्यांना तात्काळ कार्यमुक्त करून कठोर कारवाई करा, अशी मागणीही विधिमंडळाच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.

About विश्व भारत

Check Also

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे बंद ठेवा : मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे आदेश

राज्यातील धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले आहेत. पोलीस, …

वनपरिक्षेत्राधिकारी निलंबित : CM फडणवीसांची कारवाई

आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील (क्र.३५३ डी) तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटरचा गिट्टी टाकून तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *