विश्व भारत ऑनलाईन :
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र अभयारण्यातील दिमाखदार तोऱ्यात वावरत असलेली व पर्यटकांना भुरळ घालणारी झुनाबाई ही वाघीण १७ बछड्यांची आई बनली आहे. नुकतेच तिने पाचव्यांदा तीन बछड्यांना जन्म दिला आहे. देशभरातून ताडोबात येणारे पर्यटक झुनाबाईची झलक पाहण्यासाठी आतूर असतात. तिच्या वारंवार होणाऱ्या दर्शनाने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शुध्दा तिचा फॅन आहे. मागील वर्षात त्यांनी ताडोबात तब्बल आठवडाभर मुक्काम ठोकून दोन दिवस तिच्या दर्शनासाठी सफारी केली होती. त्यानंतर तिचे दर्शन झाले होते.
जगातील प्रमुख व्याघ्र प्रकल्पापैकी वाघांच्या हमखास दर्शनासाठी ताडोबा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ताडोबात दिवसेंदिवस वाघांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. ताडोबाच्या चिमूर तालुक्यातील मदनापूर गेटमधून झुनाबाई तर मटकासुर, मोगली, अशा अनेक वाघांचे पर्यटकांना होणाऱ्या दर्शनाने पर्यटकांचे पाऊले ताडोबाच्या दिशेने वळत आहेत.
‘झुनाबाई’ नावाच्या वाघिणीचे अनेक पर्यटक चाहते (फॅन) आहेत. सामान्य पर्यटकांसोबतच सेलिब्रिटीही तिचे फॅन आहेत. त्यापैकी क्रिकेटमधील देव समजला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सुध्दा एक आहे. मागील वर्षात त्यांनी ताडोबात तब्बल आठवडाभर मुक्काम ठोकला होता. झुनाबाई नावाची वाघिणीचे त्यांना विशेष आकर्षण आहे. पहिल्या दिवशी झुनाबाईचे दर्शन न झाल्याने त्यांनी दोन दिवस तिला पाहण्यासाठी मदनापूर गेट वरून सफारी केली होती. दुसऱ्या दिवशी झुनाबाईचे दर्शन घेत्यानंतरच ते परतले होते.
राष्ट्रीय अभयारण्य ताडोबा येथे नुकतेच झुनाबाईने वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांची पाऊले ताडोबाच्या दिशेने पडणार आहेत. ताडोबातील मदनापूर गेट मधील पर्यटन फेरीत पर्यटकांकरीता अविस्मरणीय ठरली आहे. 29 ऑक्टोबर ला सकाळी व दुपारी झालेल्या पर्यटन फेरीत झुनाबाई वाघिणीने 3 बछ्यांसह दर्शन दिले.
9 वर्ष वयाची झुनाबाई वाघिण ही पाचव्यांदा आई बनली आहे. आतापर्यंत तिने 17 बछड्यांना जन्म दिला आहे. पहिल्या खेपेला 3 बछडे, दुसऱ्यांदा 4, तिसऱ्यांदा 3, चौथ्यांदा 4 आणि नुकत्याच जन्मास घातलेल्या पाचव्यांदा 3 बछड्यांना जन्मास घातले आहे. 3 असे एकूण 17 बछड्यांना आजपर्यंत जन्माला घातले आहेत. नुकत्याच जन्मास घातलेले बछडे ताला (T-100) नामक वाघापासून झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.