Breaking News

अभियंत्याला ५० लाखांची लाच घेताना अटक

Advertisements

मुंबई महापालिकेच्या पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांना अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Advertisements

कार्यकारी अभियंता सतीश पवार यांनी एका कंपनीची अनधिकृत शेड न तोडण्यासाठी ५० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर कंपनीच्या मालकांनी कार्यकारी अभियंता सतीश पवार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अंधेरी पूर्वेतील मुंबई महापालिका पूर्व कार्यालयात सापळा लावून कार्यकारी अभियंता सतीश पवार यांना ५० लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. सध्या एसीबी विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक : पती-पत्नीचा जागीच मृत्यू

वर्धा येथून नागपूरकडे भरधाव येत असलेल्या कारने रस्त्यालगत उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. पती-पत्नीचा घटनास्थळीच …

उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार

उपचारासाठी आलेल्या २२ वर्षीय तरुणीवर नवी मुंबईतील नालासोपारा येथील एका स्वयंघोषित वैद्याने बलात्कार केल्याची धक्कादायक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *