Breaking News

मोबाईल : 6 वर्षीय मुलाने आईच्या बँक खात्यातून उडविले 1 लाख 78 हजार

पालकांचे मोबाइल वापरत त्यावर दिवसभर ऑनलाईन गेम मुले खेळतात. ऑनलाईन गेमचा फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागतोय. एका अवघ्या ६ वर्षीय मुलाने ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादात त्याच्या आईच्या बँक खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये उडविले.

बँक खात्यातून पैसे कमी झाल्याचे लक्षात येताच पालकांनी सायबर सेलकडे धाव घेतले. पोलिसांनी मोबाइल तपासला असता मुलाने गेमच्या नादात आई वडिलांचे पैसे उडविल्याच समोर आलं.त्यामुळे पालकांनो सावधान, ऑनलाईन गेम आणि तुमच्या पैशांवर नेम, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे. पालकांनीही सावध राहण्याचे आवाहन वर्धा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मोबाइलवर ऑनलाईन खेळले जाणारे फ्री फायर, पब्जी सारखे गेम सध्या सायबर गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनला आहे.आजकल चिमुकले हे आपल्या आई वडिलांच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम खेळतात खेळता खेळता गेमची लाईफ संपली की त्यांना पुढे खेळण्यासाठी कॉईनच्या रूपाने लाईफ घ्यावी लागती. मग काय तर पालकांच्या मोबाईलमध्ये लिंक असलेल्या ऑनलाईन पेमेंटच्या पर्यायातून मुले ते कॉईन खरेदी करतात. यामुळे मुलांचे खेळणे तर सुरु असते पण पालकांच्या खिश्याला कात्री बसत आहे.

About विश्व भारत

Check Also

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार

रायपुर में रिश्वत लेते महिला पुलिस अधिकारी गिरफ्तार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट रायपुर। महिला …

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *