Breaking News

भारत जोडोत जात असताना काँग्रेस नेते नसीम खान यांच्या गाडीचा अपघात

काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी मंत्री नसीम खान यांच्या गाडीचा नांदेडमध्ये अपघात झालाय. नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर शनिवारी हा अपघात झाला. यावेळी नसीम खान प्रवास करत असलेल्या कारला एका दुसऱ्या कारने समोरून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही कारच्या बोनेटचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. सुदैवाने या अपघातात नसीम खान यांना फारशी दुखापत झालेली नाही. केवळ त्यांच्या पायाला किरकोळ मार लागला आहे. मात्र, नसीम खान यांच्या गाडीचा चालक बऱ्यापैकी जायबंदी झाला आहे.

नसीम खान हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. नसीम खान हे नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेचे प्रभारी आहेत. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचे व्यवस्थापन हे एच.के.पाटील आणि अशोक चव्हाण करत असले तरी नांदेडची जबाबदारी नसीम खान यांच्यावर आहे. ७ नोव्हेंबरला म्हणजे उद्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करेल. त्याचीच तयारी करण्यासाठी नसीम खान नांदेडच्या दिशेने जात होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना अपघाताला सामोरे जावे लागले.

About विश्व भारत

Check Also

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा!

सनातन धर्मनगरी उत्तराखंड हरिद्वार में बड़ा ट्रेन धोखा! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट हरिद्वार। भारत …

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या

मारपीट में बेटा हुआ अपाहिज : तो पिता ने आरोपी की करवा दी हत्या टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *