Breaking News

कलाकारांचा लढा ‘कॅन्सर’सोबत

बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. तुमच्या आजुबाजूला पाहिलं तर एक-दोन रुग्ण कॅन्सरची पाहायला मिळतील. मनोरंजन विश्वातही असे बरेच कलाकार आहेत ज्यांना कॅन्सर झाला होता. अलिकडचं उदाहरण द्याचयं म्हणजे ‘परदेस‘ फेम महिमा चौधरी हिला कॅन्सर झाला होता. बऱ्याच कलाकारांनी दुर्धर अशा कॅन्सर वर मात करत नव्याने मनोरंजन विश्वात आपल्या कलेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज आहे जागतिक कॅन्सर जनजागृती दिन त्यानिमित्त जाणून घेऊ मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ज्यांना कॅन्सर झाला होता.

महिमा चौधरी

बदलत्या जीवनशैलीमुळे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे हे बऱ्याच संशोधनात सिद्ध झालं आहे. मनोरंजन विश्वात अनेकांना कॅन्सर झाला आहे. अलिकडचं उदाहरण द्यायचं म्हंटल तर महिमा चौधरी हिचं नाव घेता येईल. तिला स्तनाचा कॅन्सर झाला होता. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर महिमाचा व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली होती.

मनिषा कोईराला

मनिषा कोईरालने कॅन्सरशी चिवटपणे झूंज दिली आहे. तिला २०१२ साली ओव्हेरियन कॅन्सरचे निदान झाले होते. तिला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता. २०१५ मध्ये ती या आजारातून पूर्ण बरी झाली. तिला आजार झाला आणि बराही झाला पण ती गप्प राहिली नाही. तिने आपल्या अनुभवावर एक पुस्तकही लिहिलं. कॅन्सरबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली. आपले अनुभव आपल्या चाहत्यांशी शेअर केले.

इरफान खान

आपल्या अभिनयाने चाहत्यांना भूरळ घातलेला अभिनेता म्हणजे इरफान खान. त्याला कॅन्सरने ग्रासलं आणि तो काळाच्या पडद्याआड गेला. त्याला दुर्मिळ प्रकारचा कॅन्सर (न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर) झाला होता. परदेशी उपचार झालेही पण हे उपचार इरफानला वाचवू शकले नाहीत.

संजय दत्त

संजय दत्त अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. डॉक्टरांच्या चेकअप नंतर समजल फुफ्फुसाचा कॅन्सर झाला आहे. तिसऱ्या स्टेजवर हा कॅन्सर आहे. त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. आता त्याची तब्येत ठीक आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना याबद्दल कल्पना दिली.

सोनाली बेंद्रे

९० च्या दशकांत जिने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं त्यापैकी एक म्हणजे सोनाली बेंद्रे. तिला २०१८ मध्ये कॅन्सर झाला. पण तिने धैर्याने यावर मात केली. तिला मेटास्टॅटिक कॅन्सर झाला होता. या आजारात तिला प्रचंड त्रास झाला. ती याबद्दल लिहित आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होती.

राकेश रोशन

अभिनेते आणि दिग्दर्शक असलेले राकेश रोशन यांनाही कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यांना घशाचा कॅन्सर झाला होता. हा आजार पहिल्या स्टेजमधील होता. राकेश रोशन यांचा मुलगा बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *