Breaking News

तहसीलदार दोन लाख, तर अमरावतीच्या मुख्याधिकारी २० हजार घेताना अटकेत

Advertisements

तब्ब्ल दोन लाखांची लाच घेतल्याने अलिबागच्या तहसिलदारास आणि त्याच्या एजंटला एसीबीने अटक केली. मिनल कृष्णा दळवी असे अटक केलेल्या तहसीलदाराचे नाव आहे. तर त्याचा एजंट राकेश रमाकांत चव्हाण यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नवी मुंबई एसीबीची डीवायएसपी ज्योती देशमुख यांनी केली. एसीबीच्या या कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

Advertisements

दुसरी घटना

Advertisements

अमरावती जिल्ह्यातील भातकुली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना २० हजाराची लाज घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. शिलाई मशीन प्रशिक्षण आणि गारमेंटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती. यात वीस हजार रुपये स्वीकारताना विभागाने मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना रंगेहाथ पकडले.

तहसीलदार अटकेत

अलिबागचे तहसीलदार मिनल दळवी यांनी तक्रारदार महिलेकडे बक्षीसपत्र मिळालेली जमीन सास-यांच्या नावे नोंद होण्यासाठी एजंट मार्फत पाच लाख रूपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रूपये देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदार महिलेने नवी मुंबई लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २९ सप्टेंबर २०२२ रोजी लाचेच्या मागणीची सत्यता पडताळून पाहण्याच्या कारवाईला सुरूवात झाली.
एजंट राकेश चव्हाण याने स्वतःसाठी आणि तहसीलदारांसाठी तीन लाख रूपयांची मागणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. आज पुन्हा तहसीलदार यांनी सदर कामासाठी दोन लाख रूपये एजंटकडे देण्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर शुकवारी अलिबाग नगरपालिका समोरील आर.के. इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये तक्रारदार महिलेकडून एजंट राकेश चव्हाण याला दोन लाख रूपये घेताना एसीबीने रंगेहात पकडले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शिवसेनेच्या महिला नेत्याची पतीकडून हत्या : कारण वाचा

चारित्र्यावर संशय घेत संशयाचे भूत डोक्यात शिरल्याने पतीने मध्यरात्री पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची थरारक …

आरोग्य अधिकाऱ्यांने मागितली लाच

धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जळगावच्या तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोग्य विभागासाठी भाडेतत्त्वावरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *