मध्य महाराष्ट्रात दोन दिवस पाऊस : मराठवाडा, विदर्भ?

दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ,तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीस राज्यात असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार आहे.

राज्यात ऑक्टोबर अखेरच्या आठवड्यात किमान तापमानात झपाट्याने घट होऊन गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही राज्याच्या बहुतांश भागातील तापमानात घट होऊन थंडी अवतरली. या काळात राज्यात आकाशाची स्थिती निरभ्र आणि कोरडे हवामान निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभाग आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढलाय.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागांत तापमानाचा पारा घसरला होता. औरंगाबाद, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांत नीचांकी तापमानाची नोंद झाली. आता मात्र पुन्हा राज्याच्या बहुतांश भागांत आता अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान सरासरीच्या जवळपास आले आहे. काही भागांत रात्रीही अंशत: ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.
मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात या कारणामुळे पाऊस?

बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पुढील 24 तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. 12 नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे.

About विश्व भारत

Check Also

नागपूर, चंद्रपुरात दोन दिवस उष्णतेची लाट आणि पावसाचा अंदाज

विदर्भ, छत्तीसगड, ओडिशावर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेची …

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म

गन्ना खेेत में मादा तेंदुए ने शावक को दिया जन्म टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *