पदोपदी काय घडतंय, याची क्षणाक्षणाची बातमी मोबाईलवर पाहायला मिलते.जगातील २ कोटीहून अधिक लोक मोबाइल आणि सोशल मीडियाचे व्यसनी आहेत. भारतीय लोक दररोज सुमारे पाच तास मोबाइलवर घालवतात. अशा परिस्थितीत स्मार्टफोनच्या व्यसनाशी संबंधित मानसिक आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर डॉ. अना लेम्बके सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचे व्यसन कमी करण्यासाठी ३ मार्ग सुचवतात.
✳️‘स्क्रीन फास्ट’ करा
स्क्रीन फास्ट म्हणजे मोबाइलपासून ब्रेक घेणे. तुम्ही सुरुवातीला २४ तास स्क्रीन फास्ट घेऊ शकता. मोबाइलपासून शक्य तितके दूर राहणे हे आपले ध्येय असले पाहिजे. सुरुवातीला चिडचिड किंवा निद्रानाश यांसारखी लक्षणे जाणवू शकतात. एक महिना स्क्रीन फास्ट केल्यानंतर लोकांना कमी नैराश्य आणि चिंता वाटते.
✳️दैनिक मर्यादा सेट करा
फोन वापरावर दैनंदिन मर्यादा निश्चित करणे व्यसन दूर करण्यासाठी प्रभावी आहे. तुम्ही आठवड्याचे काही दिवस सेट करू शकता, जेव्हा तुम्ही तुमचा फोन अजिबात वापरणार नाही.
👉उदा. कामाच्या आधी किंवा नंतर. रात्रीच्या जेवणाच्या वेळी तो तुमच्या बेडरूमच्या बाहेर ठेवा किंवा प्रत्येकाचा फोन किचनच्या बाहेर बॉक्समध्ये ठेवा.
✳️फोन आकर्षक बनवू नका
तुमचा फोन कंटाळवाणा बनवल्याने स्मार्टफोनचे व्यसन कमी होते. तुमच्या फोनवरील बहुतांश अप्सच्या सूचना बंद करा. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या सूचना वारंवार दिसणार नाहीत आणि फोनप्रती तुमचे आकर्षण कमी होईल. तुम्ही ज्या अप्सवर जास्त वेळ घालवता ते दडवा, जेणेकरून ते शोधणे कठीण होईल.