Breaking News

‘तिने’ दिलाय धोका! 80 वर्षांच्या आजोबांचे सतरा लाख बुडाले

एका बँकेतील गलेलठ्ठ पगाराच्या पदावरून निवृत्त झालेल्या 80 वर्षांच्या आजोबांनी डेटिंग साईटवरील ललनेच्या जाळ्यात अडकून एक नव्हे… दोन नव्हे… तर तब्बल 17 लाख 10 हजार रुपये गमावले आहेत.

आजोबांनी दिलेल्या फिर्यादीवरून, श्रेया नावाच्या महिलेवर पुण्यातील वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी आजोबा हे वारजे-माळवाडी परिसरात राहतात. त्यांचा पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते बँकेतून अधिकारीपदावरून निवृत्त झाले. ते सध्या घरीच असतात.

त्या महिलेशी ओळख कशी?

त्यांनी त्यांच्या आयुष्याची कमाई बँकेत जमा करून ठेवली होती. डिसेंबर 2021 मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेचा फोन आला. तिने तिचे नाव श्रेया असे सांगितले. तसेच तिने फिर्यादी आजोबांना तुम्हाला डेटिंगसाठी मुलगी हवी आहे का? अशी थेट विचारणा केली. त्यावर आजोबांच्या होकारानंतर त्यांनीच तिला मुलींचे फोटो पाठविण्यास सांगितले. त्यानंतर आजोबांच्या मोबाईलवर तरुणींचे फोटो मिळाले. ते पाहून आजोबा यांनी डेटिंगसाठी कोणतीही मुलगी चालेल, असे सांगितले. त्यानंतर फोनवरील महिलेने मागणी केल्याप्रमाणे आजोबांनी तिच्या गुगल पे अकाउंटवर 3 हजार रुपये पाठवले.

त्यानंतर आजोबांनी मुलगी पाठविण्यास सांगितले असता, तिने आणखी पैसे लागतील, असे सांगून तिच्याकडील बँक अकाउंट नंबर पाठविला. त्यानंतर आजोबांनी बँकेत जाऊन तिच्या खात्यात पैसे भरले. याच दरम्यान तिने अधूनमधून आणखी पैशांची मागणी केल्यानंतर तिला वेळोवेळी पैसे पाठवले. पैसे पाठविल्यानंतर तिच्याकडे मुलीची मागणी केल्यावर ती तरुणी आणखी पैसे लागतील, अशी बतावणी करीत होती. फोनवरील ती तरुणी आज मुलगी भेटेल, उद्या मुलगी भेटेल, असे कारण सांगत होती. त्यानुसार फिर्यादी पैसे भरत गेले. काही दिवसांनंतर श्रेयाने पुन्हा त्यांना फोन करून साडेसहा लाखांची मागणी केली. त्यावर त्यांनी आधी मुलगी पाठव, मग पैसे देतो, असे बोलल्यानंतर तिने फोन करणे बंद केले. तिला वारंवार फोन लावल्यानंतर तिचा फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.

तोपर्यंत आजोबांनी त्यांच्या खात्यातून तब्बल 17 लाख 10 हजार पाठवले होते. हा प्रकार त्यांच्या मुलाला समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानुसार पोलिसांनी आता या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वारजे-माळवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक डी. जी. बागवे करीत आहेत.

About विश्व भारत

Check Also

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी

62 गौ हत्यारों पर 10-10 हजार का इनाम? नागपुर निवासी हैं सभी आरोपी   टेकचंद्र …

गौ हत्या के खिलाफ छिन्दवाडा में हिन्दुत्ववादी संगठनों का तीव्र निषेध

गौ हत्या के खिलाफ छिन्दवाडा में हिन्दुत्ववादी संगठनों का तीव्र निषेध टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *