Breaking News

पतंजलीच्या 5 औषधांवर बंदी : योगगुरू बाबा रामदेव यांना मोठा धक्का

Advertisements

उत्तराखंडमधील आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

औषधं कोणते?

Advertisements

पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.

मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

‘ब्लड प्रेशर’मध्ये ‘चालणे’ किती महत्वाचे?

धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवण्यासाठी तासन् तास जिममध्ये घाम गाळणे प्रत्येकालाच शक्य नसते. अशा वेळी …

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’

नागपुर : डागा स्त्री अस्पताल बना ‘लापरवाही का अड्डा’ टेकचंद्र शास्त्री: 9822550220   नागपुर। धुएं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *