Breaking News

लाभदायक काय : औषधं की व्यायाम? व्यायाम केल्यास तणावात घट!

औषधं घेण्याचा कंटाळा येतोय, असे शब्द कानावर पडतात. त्यामुळे व्यायाम करणे कधीही उत्तमच. मानसिक आराेग्याच्या समस्यांना ताेंड देणाऱ्यांनी व्यायाम केल्यास त्यांच्यातील निराशेत घट होण्याची शक्यता असते.

सायकियाट्रिक रिसर्चमध्ये प्रकाशित एका संशाेधनात हा दावा केला आहे. मानसिक आराेग्याची समस्या असलेल्या लाेकांनी दरराेज ३० मिनिटे शारीरिक व्यायाम केला. त्यानंतर त्यांना नैराश्याचा त्रास कमी झाल्याचे जाणवले. फेबियन डी लेग्रांड व त्याच्या टीमने १८ ते ६५ वयाेगटातील महिलांचा अभ्यास केला. अलीकडेच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्यांचा त्यात समावेश हाेता. त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. याद्वारे त्यांच्यातील आशा व निराशेची भावना जाणून घेण्यात आली.

दरराेजच्या थेरपीसाेबतच काही गतिहीन कामे निवडण्यास सांगण्यात आले हाेते. त्यानंतर काही महिलांनी दाेन दिवसांसाठी प्रत्येकी ३० मिनिटे आपल्या पसंतीचे व्यायाम केले. काहींनी आपल्या खाेलीत राहून पसंतीचे पुस्तक वाचले. खेळात सहभागी झाल्या. त्यानंतर सहभागी सर्वांना आपला अनुभव एका अर्जाद्वारे मांडण्याची सूचना करण्यात आली. दाेन दिवस व्यायाम करणाऱ्या महिलांमधील नैराश्यात काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. खाेलीत एकट्या राहणाऱ्या महिलांचे नैराश्य मात्र कमी झालेले नव्हते. सहभागींनीही या प्रकल्पावर समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम लागू करणेही साेपे ठरले. लेग्रांड म्हणाल्या, सर्वात आश्चर्यजनक म्हणजे रुग्ण आपल्या दैनंदिन व्यायामाच्या वेळेबाबत उत्साही दिसून आले. औषधींपेक्षा जास्त चांगला बदल यातून दिसून आला.

आऊटडाेअर एक्झरसाइजमुळे महिलांमध्ये उत्साह कसरतींमुळे महिलांमध्ये आत्मनिर्भरतेची भावना वाढल्याचे दिसून आले. महिलांना इनडाेअर व आऊटडाेअर टास्क देण्यात आले हाेते. त्यात खाेलीबाहेरील व्यायामामुळे जास्त उत्साह जाणवल्याचे महिलांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

देशातील अर्धी जनता शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’

या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नसल्यामुळे …

सर्वांग स्वास्थ्य लाभ हेतु रामबाण औषधि है ये कमल बीज-कंद की सब्जी

सर्वांग स्वास्थ्य लाभ हेतु रामबाण औषधि है ये कमल बीज-कंद की सब्जी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *