Breaking News

तीन डोळे, तीन शिंगे असलेल्या नंदी बैलाचे निधन

Advertisements

नंदी बैलाला वैदिक धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. धार्मिक परंपरेनुसार नंदी बैल म्हणजे भगवान शंकराचे प्रमुख वाहन आहे. त्यामुळे लोकांच्या भावना देखील आणखी प्रकट होताना दिसतात. अशातच आता मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्हातील बुंदेलखंडमधील केदारनाथ धाम प्रसिद्ध आहे. जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाचे निधन झाले आहे.

Advertisements

तीन शिंगे, तीन डोळे

Advertisements

प्रत्येक नंदी बैलाला दोन शिंगं असतात. मात्र, जटाशंकर धाम येथील प्रसिद्ध नंदी बैलाला तीन शिंगं होते. तसेच या बैलाला तीन डोळेही होते. या नंदी बैलाचं आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. मंदिर समितीच्या सदस्यांनी नंदीबैलाचा अंत्यसंस्कार संपूर्ण विधींनुसार पुर्ण केला. ब्राम्हणांच्या उपस्थितीत मंत्रपठण करत नंदी बैलाचे अंत्यसंस्कार झाले. जटाशंकर धाममधील विशेष आकर्षण हा नंदी होता.

15 वर्षापूर्वी हा नंदी फिरत फिरत जटाशंकरमध्ये आला होता. तीन डोळे आणि तीन शिंगं असल्याने गावभर चर्चा झाली. त्यानंतर तो तिथेच राहू लागला. लोकांनी त्यांचं नाव नंदी ठेवलं. भक्त ज्यावेळी जटाशंकर धाममध्ये येत असत त्यावेळी ते नंदीचही दर्शन घेत असत.

नंदीच्या मृत्यूनंतर महिलांनी नंदीच्या मृतदेहाजवळ बसून भजन आणि कीर्तन केलं. जो ज्याठिकाणी बसायचा, त्याचठिकाणी त्याची समाधी देखील बांधण्यात येणार आहे. जटाशंकर धाम म्हणजे खूप आकर्षक ठिकाण. अनेक भाविक आणि पर्यटक भेटी देत असतात. मात्र, आता भाविकांना नंदीचं दर्शन घेता येणार नाही. या घटनेमुळे भाविकांना अतीव दुःख झालंय.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:307) कैसे पड़ा मारुती नंदन हनुमान जी महाराज का नाम? कथा बड़ी ही रोचक है

(भाग:307) कैसे पड़ा मारुती नंदन हनुमान जी महाराज का नाम? कथा बड़ी ही रोचक है …

कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी

कांग्रेस नेता रत्नदीपजी रंगारी ने श्रीवास नगर महादुला के हनुमान मंदिर देवस्थान को भेंट दी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *