शिस्तबद्ध अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या कामाची धडकी आता आरोग्य सेवकांनाही भरली आहे. काम नीट करा, नाहीतर नोकरी सोडा.. असा इशारा देणारे आणि एकामागून एक आदेश देत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढेंनी आरोग्य सेवकांच्या नाकीनऊ आणलेत.
तुकाराम मुंढे आरोग्य आयुक्त म्हणून रुजू होऊन महिना दोन महिनेही झाले नाहीत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरु झालेत. आरोग्य मंत्र्यांनी तुकाराम मुंढेंना बोलवून त्यांना सूचनाही करण्यात आल्यात. इतकंच नाही तर तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी थेट तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना गळ घातलीये अशा ही चर्चा सुरु झालेत. आपल्या धडाकेबाज कामाने नागरिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या तुकाराम मुंढेंना आरोग्यसेवक का वैतागतेल, तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी प्रयत्न का होतायत, तानाजी सावंतांची तुकाराम मुंढेंनी कशी अडचण केलीय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.