Breaking News

पोटदुखी, अपचनकडे दुर्लक्ष नको : पोट, जठर कॅन्सरची लक्षणे बळावतात

Advertisements

कर्करोग हा एक प्राणघातक आजार आहे. पोटाचा कर्करोग म्हणजेच जठराचा कर्करोग हा त्यातील एक प्रकार आहे. पोटाच्या कर्करोगाचे मुख्य कारण म्हणजे काही कारणामुळे पेशी पोटात असामान्यपणे पसरतात आणि वाढू लागतात. पूर्वी असे मानले जात होते की, पोटाचा कर्करोग मोठ्या वयाच्या लोकांनाच होतो, परंतु आता 30 आणि 40 वर्षांचे लोक देखील या आजाराला बळी पडू लागले आहेत. चुकीच्या जीवनशैलीमुळे त्याचा धोका वाढला आहे. पोटाच्या कर्करोगाला धोकादायक म्हटलं जातं, प्राथमिक चाचण्यांमध्ये त्याची लक्षणे दिसत नाहीत. मसालेदार अन्न, कॅन्सरचा कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान, जुन्या शस्त्रक्रिया आणि दीर्घकाळ जठरामध्ये जळजळ ही कारणे आहेत. हा कर्करोग टाळण्याचा मार्ग म्हणजे त्याची लक्षणे वेळीच ओळखणे, म्हणजे हा धोकादायक आजार टाळता येईल. पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे जाणून घेऊया.

Advertisements

अपचन

Advertisements

अहवालानुसार, एखादी व्यक्ती अन्न नीट पचवू शकत नसेल. काहीही खाल्ले तरी छातीत जळजळ होते आणि ढेकर येऊन अन्न घशात परत येऊ लागलं तर ते पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. अपचनावरील सामान्य औषधे काम करत नसतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

सतत पोटात जळजळ

जर एखाद्या व्यक्तीला पोटात सतत जळजळ होत असेल तर ती सामान्यतः खाल्ल्यानंतर जळजळ समजली जाते. मात्र, ही समस्या सातत्याने होत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. असे दीर्घकाळ राहणे हे पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

त्वचेवर गुठळ्या आणि पुरळ दिसणे

पोटाच्या कर्करोगाची लक्षणे त्वचेवरही दिसून येतात. त्वचेवर पुरळ दिसणे आणि सूज येण्याबरोबरच त्वचा सोलणे हे देखील आतड्याच्या कॅन्सरचे लक्षण असू शकते.

भूक न लागणे

अचानक आणि कोणत्याही कारणाशिवाय व्यक्तीला भूक लागणे थांबते. त्याला काही खावेसे वाटत नाही आणि त्याची आवडती वस्तू पाहूनही पोट भरलेले आहे, असे वाटते. ताटातील थोडं काही खाल्यानंतर लगेच पोट भरल्यासारखं वाटतं. ही कोलन/पोटाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात.

उलट्या आणि मळमळ होणे

काही खाल्ल्यानंतर लगेच उलटी आणि मळमळ होणे आणि काही वेळा काही न खाणे हे देखील पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

वजन कमी होणे –

भूक न लागण्यासोबतच व्यक्तीचे वजनही अचानक कमी होऊ लागते. त्याला अशक्तपणा जाणवू लागतो आणि थकवा जाणवू लागतो. हे लक्षण कर्करोगाचे देखील असू शकते.

(सूचना : वरील माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहेत. विश्व भारत न्यूज पोर्टल त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत

सुसनी साग के उपयोग से शिथिल नसों और शरीर की हड्डियों में चट्टान जैसी ताकत …

तरबूज खाने के बाद हुई उल्टियां और दस्त? युवती की मौत से मचा हड़कंप

तरबूज खाने के बाद हुई उल्टियां और दस्त? युवती की मौत से मचा हड़कंप   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *