Breaking News

झाडांची बेकायदा कत्तल : तीन अधिकारी निलंबित

झाडांची बेकायदा कत्तल केल्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.

संजीव प्रल्हाद राक्षे, मच्छिंद्र नामदेव कडाळे, भरत रामभाऊ पारखी अशी या तिघांची नावे आहेत. त्यांनी परवानगीशिवाय झाडांची कत्तल केल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना न देता निगडीतील सावरकर उद्यान; तसेच चिंचवडच्या दत्तनगर उद्यानातील झाडे तोडली. तसेच काही झाडांच्या फांद्याही तोडल्या. त्यांनी आर्थिक फायद्यासाठी हे कृत्य केल्याची बाब सकृतदर्शनी निदर्शनास आली आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू केली आहे, असे आयुक्त सिंह यांनी सांगितले.

About विश्व भारत

Check Also

आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यभरात येत्या तीन ते चार दिवस वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची …

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा

छुई-कान्हीवाड़ा परिसर में रेस्क्यू कर बाघ को पकड़ा   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *