Breaking News

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान! लठ्ठपणाचा धोका

जेवताना टीव्ही पाहत असाल तर सावधान… तुमचे वजन वाढू शकते. सकाळच्यावेळी नाष्टा करताना टीव्ही अजिबात पाहू नये. खातांना टीव्ही पाहण्याने तुमचे लक्ष टीव्हीवरच राहते. त्यामुळे तुम्ही किती खात आहात यावर नियंत्रण राहत नाही. यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

असं म्हणतात की, जर सकाळची सुरुवात चांगली असेल तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची चांगली सुरूवात झाल्याने आरोग्य तंदुरुस्त आणि चपळ बनवण्यास मदत होते.

मात्र, आज अनेकांच्या अशा सवयी आहेत ज्यामुळे संपूर्ण दिनचर्याच बिघडते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आज आम्ही तुम्हाला सकाळच्या अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत ज्या लठ्ठपणाासाठी कारणीभूत ठरू शकतात.

✳️जास्त वेळ झोप

उत्तम आरोग्यासाठी चांगली झोप खूप महत्त्वाची असून, रोज 7 ते 8 तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, यापेक्षा अधिकची झोप तुमची दिवसभराची दिनचर्या बिघडवू शकते. उशिरा उठल्याने नाष्ट्यापासून सर्वच गोष्टींचे नियोजन बिघडते. याचा पचनसंस्थेवरही परिणाम होतो. ज्या व्यक्ती 9 ते 10 तास झोपतात अशा व्यक्तींमध्ये लठ्ठपणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.

✳️व्यायाम न करणे

जर तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर, सकाळी उठून व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. रिकाम्या पोटी व्यायाम केल्याने फॅट बर्न होण्यास मदत होते. तसेच वजनही कमी होते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत राहण्यास मदत होते.

✳️पाणी न पिणे

सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. अनेक जण सकाळी उठल्यानंतर पाणी न पिण्याची खूप मोठी चूक करतात. झोपोतून उठल्यानंतर पाणी पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. तसेच कॅलरी बर्न करण्यासही मदत होते. रिकाम्या पोटी पाणी न पिल्याने पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते तसेच लठ्ठपणाचेही शिकार होऊ शकता. त्यामुळे भविष्यातील आरोग्याच्या तक्रारी टाळण्यासाठी दिवसाची सुरुवात एक ग्लास पाणी पिऊन करावी.

✳️साखरेचा चहा पिणे

अनेकांची दिवसाची सुरुवात चहा-कॉफीने होते, पण जर आपण सकाळी लवकर अति साखर आणि क्रीमयुक्त चहा-कॉफीचे सेवन केले तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. क्रीम आणि साखरेने भरलेली कॉफी आणि चहा वजन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो.

About विश्व भारत

Check Also

देशातील अर्धी जनता शारीरिकदृष्ट्या ‘अनफिट’

या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पोषक आहार आणि नियमित व्यायाम करत नसल्यामुळे …

सर्वांग स्वास्थ्य लाभ हेतु रामबाण औषधि है ये कमल बीज-कंद की सब्जी

सर्वांग स्वास्थ्य लाभ हेतु रामबाण औषधि है ये कमल बीज-कंद की सब्जी टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *