Breaking News

मुख्यमंत्री पदाची डोक्यात हवा गेली नाही, सरकार पाडून दाखवा…

Advertisements

हिंमत असेल तर उद्धव ठाकरेनी सरकार पाडून दाखवावे, आमच्याकडे १७० आमदारांचं बहुमत आहे. माझ्या डोक्यात आजही मुख्यमंत्रीपदाची हवा गेलेली नाही. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. एवढंच नाही तर हाताच्या रेषा दाखवायची आम्हाला गरज नाही, मनगटात ताकद आहे ती दाखवायची ताकद आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. आम्ही मंदिरात जायला घाबरत नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांनाही उत्तर दिलं आहे.

Advertisements

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात घडलेले मोठे-मोठे शिवसैनिक आज आपल्यासोबत आहेत. गजानन किर्तीकर, रामदास कदम, आनंदराव अडसूळ अशा ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याचा सल्लाही दिला. सीमा प्रश्नावरून वातावरण तापलेलं असताना त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *