Breaking News

हृदयरोग व स्ट्रोक टाळायचा असल्यास सकाळी व्यायाम करा!

Advertisements

एका नव्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, सकाळचा व्यायाम हृदयविकार आणि स्ट्रोकपासून वाचवतो. ‘युरोपियन जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी’मध्ये याबाबतची माहिती प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सकाळच्या व्यायामामुळे हृदयरोग व स्ट्रोकचा धोका बर्‍याच अंशी कमी होतो.

Advertisements

हृदयासंबंधीच्या आरोग्यातील गुंतागुंत कमी करण्यासाठी आणि संपूर्ण आरोग्य लाभासाठी व्यायाम करणे हा सर्वात परिणामकारक पर्याय ठरू शकतो. त्यामध्येही सकाळच्या वेळी केलेला व्यायाम अधिक लाभदायक ठरतो. या संशोधनासाठी वैज्ञानिकांच्या टीमने युके बायोबँकच्या डेटाचा वापर केला. त्यामध्ये 42 ते 78 वर्षे वयाच्या 86,657 लोकांचा डेटा पाहण्यात आला. हे सर्व मुळात हृदयविकारापासून मुक्त होते. त्यामध्ये 58 टक्के महिला होत्या.

Advertisements

सहा ते आठ वर्षे घेतलेल्या फॉलोअपदरम्यान 2,911 सहभागी लोकांमध्ये कोरोनरी आर्टरी डिसीज आणि 796 मध्ये स्ट्रोकची समस्या दिसून आली. या दोन्ही समस्यांची कारणे जाणून घेण्यासाठी काही प्रश्ने विचारण्यात आली, तसेच सहभागी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अभ्यास करण्यात आला. त्यामधून असे आढळले की, 24 तासांच्या अवधीत जे लोक सकाळी आठ ते अकराच्या दरम्यान शारीरिक स्तरावर अधिक सक्रिय असतात किंवा या वेळेत ज्यांनी योग-व्यायाम केला आहे, त्यांच्यामध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा धोका कमी असतो. पाहणीत ज्या लोकांमध्ये या समस्या आढळल्या ते बहुतांश निष्क्रिय होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड से खत्म

पौष्टिक तत्वों का खजाना है ये कलमी साग के सेवन से कब्ज, बवासीर, डायबिटीज जड …

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? प्रयोग के लिए सावधानियां जरुरी

आंखों का धुंधलापन मिटाने के लिए इन 7 तरीकों से फायदेमंद हो सकती है फिटकरी? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *