Breaking News

मंदिरांमध्ये मोबाईलवर बंदी; उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण आदेश!

 

मोबाईल आणि मानव यांचं अतूट नातं तयार झालं आहे. मोबाईलला जरासाही आपल्यापासून इकडे-तिकडे जाऊ द्यायचच नाही, असा आग्रह अनेकांचा असतो. पण, काही काळ का असेना आता मोबाईलपासून दूर व्हावे लागेल. यासंदर्भात काय आहे बातमी… वाचा

अनेक मंदिरांमध्ये ‘मोबाईल बंद ठेवा’, ‘शांतता पाळा’, ‘फोटो काढण्यास मनाई’ अशा सूचना लिहिलेल्या पाहायला मिळतात. मंदिर प्रशासनाकडून या सूचना दिल्या जातात. पण, आता थेट मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई खंडपीठानं मंदिरांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तिरुचेंदुरच्या सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर प्रशासनाकडून यासंदर्भात याचिका सादर करण्यात आली होती. यावर झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संपूर्ण तामिळनाडूमधल्या मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश तामिळनाडू सरकारला दिले. यावेळी मंदिरात शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी हे निर्देश दिल्याचंही नमूद केले आहे.

वास्तविक सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर प्रशासनाने त्या मंदिरात मोबाईल फोनवर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, आदेश देताना न्यायालयाने संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये मोबाईल फोनवर बंदी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मंदिरात पावित्र्य आणि शुद्धता राखली जावी, यासाठी मोबाईल फोनवर बंदी असावी, असं या आदेशांत नमूद केल्याचं वृ्त्त’लाईव्ह लॉ’नं दिलं आहे.

याचिकाकर्त्यांचा दावा काय?

गेल्या महिन्यात ही याचिका दाखल करण्यात आली होती. ‘सुब्रह्मण्यमस्वामी मंदिर हे एक प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये ‘आगम’ नियमावली महत्त्वाची भूमिका पार पाडते. यानुसार मोबाईल फोन किंवा कॅमेरे किंवा फोटोग्राफी याला मनाई करण्यात आली आहे. पण हल्ली मोबाईल फोनवरही फोटो किंवा व्हिडीओ काढले जातात. मूर्ती आणि पूजाविधींचे फोटो काढले जातात. त्यामुळे इतर भक्तांनाही त्याचा त्रास होतो’, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे.

मोबाईल फोन आणि कॅमेऱ्याचा वापर निषिद्ध असल्याचं बजावणारे नोटीस बोर्ड मंदिरात ठिकठिकाणी लावण्यात आल्याची माहिती याचिकाकर्त्यांकडून न्यायालयाला देण्यात आली. तसेच, मंदिरात येणाऱ्या भक्तांनी योग्य पद्धतीने पेहेराव करणं आवश्यक आहे, अशीही मागणी मंदिर प्रशासनाकडून न्यायालयाकडे करण्यात आली.

यावर निकाल देताना न्यायालयाने फक्त सुब्रह्मण्यमस्वामी मंदिरातच नाही, तर राज्यातल्या सर्वच मंदिरांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले. तसेच, भक्तांची गैरसोय होऊ नये, म्हणून मंदिराच्या बाहेरच मोबाईल फोन ठेवण्यासाठी लॉकर्सची व्यवस्था करण्यात यावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.

About विश्व भारत

Check Also

गीतांजलि अगमों का राष्ट्रपति मुर्मू को ज्ञापन! PM मोदी- शाह को प्रतिलिपी

गीतांजलि अगमों का राष्ट्रपति मुर्मू को ज्ञापन! PM मोदी- शाह को प्रतिलिपि टेकचंद्र शास्त्री: सह-संपादक …

जनता का ध्यान भटकाने भगवान विष्णु पर टिप्पणी व CJI पर जूता काण्ड

जनता का ध्यान भटकाने भगवान विष्णु पर टिप्पणी व CJI पर जूता काण्ड   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *