Breaking News

मोदी रविवारी नागपुरात : मेट्रो स्टेशन चकाचक, 240 कॅमेऱ्यांची नजर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण होणार आहे. तसेच नागपूर मध्यवर्ती रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास कामाचे भूमिपूजनही होणार आहे. यावेळी नागपूर रेल्वेस्थानकावर २४० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. नागपूर मेट्रोने मोदी प्रवास करतील. त्यासाठी स्थानकावर स्वच्छता ठेवली जात आहे.सोबतच पोलीस विभागानेही चोख नियोजन केले असून शेकडो पोलिसांची बहुस्तरीय सुरक्षा मोदींना पुरवली जाणार आहे.

पंतप्रधान ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. वंदे भारत एक्सप्रेसला ते हिरवा कंदील देणार आहे. यासाठी ते विमानतळावरून नागपूर रेल्वेस्थानकावर येत आहेत. रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे देखील भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठी रेल्वेने तयारी केली असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

About विश्व भारत

Check Also

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती

12 वीं पास युवाओं के लिए 15 हजार पदों पर निकली भर्ती टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

यूनिवर्सिटी में CM ममता बनर्जी के भाषण मे हंगामा

यूनिवर्सिटी में CM ममता बनर्जी के भाषण मे हंगामा टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *