Breaking News

नागपुरात रुग्णवाहिकेत सिलिंडरचा स्फोट

नागपुरातील मानेवाडा बेसा परिसरातील रेवतीनगरमध्ये शुक्रवार दुपारी एका उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा एकाचवेळी स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

कशी घडली घटना?

रेवतीनगर येथे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रुग्णवाहिकेतील २ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर बॉम्बसारखा आवाज ऐकू आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोक घराबाहेर पळत आले. स्फोटानंतर आकाशात धुराचे मोठे लोळ दिसत होते. नागपूर महापालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन विभागाचे कर्मचारी आणि बेलतरोडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. तपास पोलीस करत आहेत.

About विश्व भारत

Check Also

नागपुरात पक्षी विमानाला धडकला :भाजप, काँग्रेस नेत्यांसाह २७२ प्रवाशांना उतरवले

नागपूरहून कोलकाताकडे निघालेल्या इंडिगो विमानाला पक्षी धडकल्याने काही मिनिटांतच २७२ प्रवाशांना सुखरूप नागपूरला उतरवण्यात आले. …

कोराडी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे मंत्री बावनकुळे यांच्या घरी गणेशउत्सवानिमित्त कार्यक्रम

🌹🌹॥ जय गुरु ॥🌹🌹   सर्व होते केले असता । सर्व मिळते धरिता हाता ।। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *