Breaking News

तहसीलदार निलंबित : नियमबाह्य कामे भोवली

Advertisements

नियमबाह्य कामे केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना निलंबित करण्यात आले आहे. फेब्रुवारी, मे व जून २०२२ मध्ये केलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई केल्याचे करण्यात आदेशात म्हटले आहे.

Advertisements

ही आहेत प्रकरणे?

Advertisements

तहसीलदार कोलते यांना तीन प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या योग्य त्या परवानगी शिवाय राखीव वन विभागातील जमिन प्रदान केली असल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच कोविड काळातही शासन निर्णयातील तरतुदीच्या विहित कार्यपद्धतीमध्ये काम न केल्याबाबतही दुसरी तक्रार करण्यात आली होती. त्याबरोबरीने होऊ घातलेल्या निवडणुकीच्या कामात मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. या सर्व तक्राराची चौकशी केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तृप्ती कोलते यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तहसीलदार तृप्ती कोलते यांना पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. या निलंबन कारवाईत त्यांना केवळ निर्वाह भत्ता मिळणार असल्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच निलंबनाच्या या कारवाईत तृप्ती कोलते यांनी कोणताही व्यवसाय अथवा खाजगी नोकरी करू नये असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

6 तहसीलदार निलंबित

शासनाने आदेश देऊनही मागील अडीच महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यात रुजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना शासनाने …

‘पीडब्लूडी’चे संजय उपाध्ये, प्रशांत वसुले यांचा पुरस्काराने गौरव : मंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या अभियंत्यांना राज्य शासनातर्फे पुरस्कार घोषित करण्यात आला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *