पुण्यातील लता मंगेशकर हॉस्पिटल गरिबांचं हॉस्पिटल म्हटलं जातं पण याच हॉस्पिटलमध्ये सिझेरियन डिलिव्हरी साठी 10 लाख रुपये घेतात. आणि विलंब लागल्यास मातेचा किंवा बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो असे असताना सुद्धा त्याच्या जीवा पेक्षा पैसा मोठा झालाय का ? 10 नाही पण 3 लाख भरायची तयारी दाखवली जातेय.. मंत्रालयातून फोन जातोय तरी देखील हॉस्पिटल प्रशासनाचा जीव 10 लाखाच्या पूर्ण रकमेमध्ये अडकलाय.. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा! असं म्हणतात ना ?मग त्या ईश्वराची सुद्धा भिती वाटू नये ?
याच पैशांच्या लोभापायी आपल्या एका भगिनीचा मृत्यू झालाय आणि तिची जुळी लेकरं जन्मतः च पोरकी झाली आहेत..
यांचा माज तर उतरायलाच हवा..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हॉस्पिटल वर लवकरात लवकर कारवाई करून न्याय द्याच.. पण या पुढे आमच्या कोणत्याही भगिनीवर किंवा भाववर पैशाच्या मोहापायी अथवा पैशा अभावी जवळच्या व्यक्तीला गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून, अशा रुग्णांची लूट करणाऱ्या लुटारू हॉस्पिटल वर योग्य कारवाई करून ही लूट थांबवा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.