Breaking News

किडनीकडे द्या लक्ष, अन्यथा…!

शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव काढून टाकण्यात किडनीची भूमिका महत्त्वाची असते. शरीरातील मीठ, पाणी आणि इतर रसायनांचे प्रमाण नियंत्रित करून संपूर्ण मूत्रप्रणालीचे कार्य सुरळीत राखण्यास मदत करते. मूत्रपिंडाचे कार्य योग्यरीत्या नसल्यास एखाद्याला दीर्घकालीन मूत्रपिंडाचा आजार होऊ शकतो. किडनीचे आरोग्य सुधारण्यासाठी काय करता येईल, ते जाणून घेऊया…

किडनीचे कार्य कोणते?

किडनी ही टाकाऊ पदार्थ, जास्तीचे पाणी आणि रक्तातील इतर अशुद्धता लघवीद्वारे फिल्टर करते. एवढेच नाही तर शरीरातील पीएच, मीठ आणि पोटॅशियमची पातळी नियंत्रित करण्यासाठी, हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी, स्नायूंच्या कार्याचे नियमन करण्यासाठी, व्हिटॅमिन डी सक्रिय करण्यासाठीदेखील मूत्रपिंड जबाबदार असते. परंतु, मूत्रपिंडाच्या आजाराबाबत अजूनही जागरूकतेचा अभाव आहे आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने लोकांना डायलिसिसची आवश्यकता भासते. शिवाय शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाचा आजार असलेल्यांना किडनी प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. म्हणूनच आपण स्वत:ची काळजी घेत किडनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रयत्न करायला हवा.

☘️पुरेसे पाणी प्या

भरपूर पाणी प्यायल्याने मूत्रपिंडांद्वारे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि मूत्रपिंडाच्या आजाराची शक्यता देखील कमी करते. मूतखड्याचा इतिहास असलेल्या व्यक्तीने भविष्यात मूत्रपिंडात खडे तयार होऊ नये, याकरिता पुरेसे पाणी प्यावे.

☘️धूम्रपान टाळा

धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, मूत्रपिंडातील रक्तप्रवाह मर्यादित होतो. धूम्रपानाने एखाद्याला रेनल सेल कार्सिनोमा होण्याचा धोका असतो, जो किडनी कर्करोगाचा एक प्रकार आहे.

☘️शारीरिकद़ृष्ट्या सक्रिय व्हा

दररोज व्यायाम करणे केवळ हृदय किंवा फुफ्फुसासाठीच नाही तर मूत्रपिंडांसाठी देखील फायदेशीर आहे. नियमित शारीरिक हालचालींमुळे वजन नियंत्रित राखण्यात आणि किडनीच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होईल. व्यायामामुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करण्यात मदत होते, रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही चालण्यापासून सुरुवात करू शकता आणि हळूहळू पोहणे, सायकलिंग, धावणे, एरोबिक्स, योग किंवा अगदी पिलेटस्ही करू शकता. दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे.

☘️आहारात मिठाचे नियंत्रण

पॅकफूड, जंकफूड सारख्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे त्याचे जास्त सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. तसेच जास्त प्रमाणात केले जाणारे मिठाचे सेवन मूत्रपिंडाचे नुकसान करते.

☘️नियमित किडनीचे आरोग्य तपासा

40% किडनी रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यासाठी वेळोवेळी सीरम क्रिएटिनिन आणि लघवीचे मूल्यांकन हे किडनीच्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करते, असे वैद्यकीय तज्ज्ञ मंडळींचे मत आहे.

About विश्व भारत

Check Also

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच

अर्पण फाउंडेशन के तत्वावधान में महिलाओं के स्वास्थ की जांच टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

आजपासून विदर्भात उष्णतेची लाट

  आजपासून २१, २२ आणि २३ एप्रिलला विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. संपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *