पोस्ट खात्यात सहायक पोस्ट मास्टर पदासाठी बोगस भरती केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला कुणाचा फोन आल्यास सावधान असावे. तसेच पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने चालवले जाणारे देशातील सर्वात मोठे नोकरभरती घोटाळा रॅकेट ओडिशा पोलिसांनी अलीकडेच उघडकीला आणले आहे.
उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून हे रॅकेट चालवणाऱ्या बी.टेक. शिकलेल्या म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बनावट कॉलसेंटर, बनावट वेबसाईट, शेकडो बोगस सिम कार्ड, आर्थिक उलाढालीसाठी सुविधा केंद्रांचा आणि बनावट बँक खात्यांचा वापर, अशा पद्धतीने हे रॅकेट चालवले जात होते. उभे केले होते. अलिगढच्या गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांतील ५० हजारांहून अधिक तरुणांना या रॅकेटच्या माध्यमातून गंडा घातला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.