Breaking News

आयएएस अधिकाऱ्याकडून सहकाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या : कारवाईची मागणी

Advertisements

बिहारमधील एका आयएएस अधिकाऱ्याने सहकर्मचाऱ्यांना घाणेरड्या शिव्या दिल्या. त्याबद्दलचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला. त्यावर बिहारच्या भाजप प्रवक्त्यांनी कडक कारवाईची मागणी केलीय. त्या अधिकाऱ्याला काढून टाकावे, असेही त्यांनी म्हटले.

Advertisements

बिहारमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याचा शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सध्या वातावरण तापलं आहे. त्या व्हिडिओत आयएएस अधिकारी के. के. पाठक यांनी बिहारच्या नागरिकांबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले. सहकर्मचाऱ्यांना आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. एका संघटनेच्या प्रतिनिधींनाही तो बडबडला. पाठक हे Bihar Institute of Public Administration & Rural Development महासंचालक आहेत. बिहारच्या एक्साइज अँड प्रोहिबिशन विभागाचे ते अतिरिक्त मुख्य सचिवही आहेत. त्यांच्याबाबत आजवर अनेक तक्रारी येऊनही राज्य सरकारनं अद्याप त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. आता मात्र भाजपकडून त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होते. पाठक यांनी माफी मागावी किंवा सरकारनं त्यांना बडतर्फ करावं असं भाजपचे बिहारमधले प्रवक्ते निखिल आनंद यांनी म्हटलंय. त्यांनी त्यांच्या ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केलाय. ‘पाठक उच्चशिक्षित असतील; पण नोकरीमध्ये बराच काळ घालवल्यानंतर पाठक यांना मानसिक निराशा आली असावी,’ असं त्या व्हिडिओबाबत त्यांनी लिहिलंय. रस्त्यावरच्या गुंडाप्रमाणे ते आई-बहिणीवरून शिव्या देत आहेत. आता त्यांनी माफी मागावी किंवा त्यांना काढून टाकावं असंही त्यांनी लिहिलंय.

Advertisements

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही भाजपनं टीका केलीय. मुख्यमंत्र्यांचं प्रशासनावर नियंत्रण नसल्याचं त्यांनी म्हटलंय. “पोलीस आणि प्रशासन यंत्रणेवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांचं अजिबात नियंत्रण नाही. या सरकारमधली अराजकता आणि बेलगाम नोकरशाही नागरिकांशी स्वैरपणे वागते आहे,” असे भाजपने म्हटले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

टोलनाके होणार बंद? नवी यंत्रणा कशी असेल?

केंद्र सरकारने पथकर संकलनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आधारित यंत्रणा आणण्याची योजना आखली आहे. ही …

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी बड़ी बात

सीनियर अधिवक्ता के साथ दुर्व्यवहार पर सुप्रीम कोर्ट सख्त? सरकार को नोटिस जारी! कह दी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *