Breaking News

बागेश्वर धाम महाराज अडचणीत : वादग्रस्त विधानानंतर नागपुरात कुणबी समाज आक्रमक

Advertisements

बागेश्वर धामचे वादग्रस्त पुजारी धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबाबत अलीकडेच आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.कुणबी समाजात याचे पडसाद उमटले असून असून धीरेंद्र महाराज यांच्याविरोधात नागपूर पोलिसात तक्रार करणार आहे. विशेष म्हणजे नागपूर पोलिसांनी या वादग्रस्त महाराजांना जादूटोणा कायद्याअंतर्गत क्लिनचीट दिली आहे.

Advertisements

धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी एका प्रवचनात संत तुकाराम महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करीत त्यांचा अवमान केला. समाजाच्या भावना दुखवल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे, अशी माहिती अखिल कुणबी समाजाचे पदाधिकारी माजी आमदार दीनानाथ पडोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

धीरेंद्र कृष्ण महाराज स्वयंघोषित कथाकार आहेत. संत तुकाराम महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे समस्त कुणबी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येईल, जेणेकरून भविष्यात तुकाराम महाराज यांच्याबाबत कुणीही आक्षेपार्ह विधान करण्याची हिंमत करणार नाही, असे पडोळे म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना! परंतु रामाचरण का अभाव 

500 वर्ष संघर्ष के बाद राम मंदिर तो बना परंतु रामाचरण का अभाव   टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *