Breaking News

नागपूर हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न : दोघांना अटक

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ (हायकोर्ट)परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. चोरटे या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड केले.

ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरात घडली. न्यायमूर्ती व वकिलांची वाहने या परिसरात पार्क करण्यात येतात. त्यामुळे नागपूर खंडपीठाचा परिसर बराच मोठा आहे. या परिसरात बऱ्याच प्रमाणात झाडे आहेत. विविध प्रकारच्या या झाडांमध्ये चंदनाच्याही झाडाचा समावेश आहे. शुक्रवारी पहाटे दोन चोरटे न्यायालयाच्या परिसरात घुसले. त्यांनी भिंत ओलांडूनच प्रवेश केला असावा, अशी दाट शक्यता आहे. यानंतर ते या परिसरातील चंदनाचे झाड तोडू लागले. ते तोडण्यातही त्यांना यश मिळाले.न्यायालयाच्या परिसरात चोवीस तास पोलिस सुरक्षा असते. रात्रपाळीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना झाड तोडण्याचा आवाज आला. यामुळे ते सतर्क झाले. ते लक्षात येताच चोरट्यांनी पळ काढला. चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांनी दिली. हायकोर्ट परिसरात तसेच सिव्हिल लाइन्स भागात मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातून तपास केला जात आहे.

About विश्व भारत

Check Also

3 एकड़ की जमीन कई लोगों को बेचा

3 एकड़ की जमीन कई लोगों को बेचा, ठगबाज गिरफ्तार   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना

CM देवेंद्र फडणवीस ने की कोराडी जगदंबा देवस्थान में पूजा अर्चना टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *