सातबारा उताऱ्यावर तक्रारदारांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याच्या मोबदल्यात हॉटेल पार्टी करीत बिलाचे पैसे घेतल्याप्रकरणी एका खासगी व्यक्तीस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.
रवींद्र कारभारी मोरे (42, रा. चांदवड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे.मोरे हा तलाठी कार्यालयात खासगी मदतनीस म्हणून काम करत असल्याचे समोर आले आहे. चांदवडमधील 31 वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी त्यांच्या वडीलांच्या नावे 50 गुंठे जमीन विकत घेतली होती. या सातबारा उताऱ्यावर तक्रारदार यांच्या वडिलांचे नाव लावून दिल्याचे मोबदल्यात संशयित रवींद्र मोरे हॉटेलमध्ये पार्टी केल्याचे सांगत बिलाचे 2 हजार 940 रुपये बक्षीस स्वरुपात मागितले. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून संशयितास पकडले आहे.