Breaking News

‘पीडब्लूडी’ला खड्डे दिसतील का? निव्वळ टोलवसुलीकडे लक्ष : व्यथा नागपूर-अमरावती रस्त्याची

नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, काही ठिकाणी रस्तेही खराब झाले आहेत. या वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तत्काळ दुरुस्त करावे, खड्डे असलेल्या मार्गावरील टोलवसुली बंद करावी, अशी मागणी नागरिक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्लूडी)करीत आहेत.

नागपूर-अमरावती महामार्गावर तीन टोल नाक्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने वाहनधारकांचा वेळ वाया जातो. नाक्यावरील अनेक काउंटर्स बंद असतात. त्यामुळे रांगा लागतात व स्वयंचलित यंत्रणाही अनेकवेळा काम करत नाही. वडधामनापासून तसेच, तिवसाजवळ २०-२५ मीटरच्या अंतरावर मोठे खड्डे पडले आहेत. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. टोलनाक्यावर तक्रार पुस्तिकेची मागणी केल्यास कर्मचारी गुंडांसारखे वागतात.हिंगणघाट ते पांढरकवडा हा सुमारे २५ किलोमीटर लांब रस्ता पूर्णतः उद्ध्वस्त झाला आहे. टोल दिल्यानंतरही नागरिकांची गैरसोय होते, याकडे नागरिक लक्ष वेधत आहे.

टोल वसुलीबाबत स्वयंचलित प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. टोल जमा करताना एका लेनमध्ये सहाहून अधिक वाहने असल्यास ​बंद तिकीट काउंटर सुरू करणे आवश्यक आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने अनेक ठिकाणी अपघात होण्याची भीती आहे.

About विश्व भारत

Check Also

बदल्यांसाठी किती पैसे दिले? मंत्री काय म्हणाले?

राज्यातील शालेय शिक्षण विभागामध्ये बदल्यांसाठी गैरप्रकार होत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ …

तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या ‘पीडब्लूडी’ अधिकाऱ्याला अटक

लग्नाचे आमिष दाखवत ३० वर्षीय तरुणीचे मागील ७ वर्षांपासून शारीरिक शोषण करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील(पीडब्लूडी)अधिकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *