Breaking News

तुम्ही साखर किती खाताय?आजच थांबवा…!

आयुष्यात किती साखर खातो हे कधी तुम्ही मोजलय का ? काहीजण तर गोड खाल्ल्याशिवाय राहूच शकत नाहीत. पण जर तुम्हीसुद्धा प्रमाणापेक्षा जास्त साखर खात असाल तर सावधान व्हा!तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा आणि वेळीच सावध व्हा. साखर ही अशी गोष्ट आहे जी न खाता कोणीच राहू शकणार नाही. साखरेचा वापर प्रत्येक गोड पदार्थात केलाच जातो. दररोज बरेच जण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साखरेचं सेवन करतात. कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही,मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार साखर जर कमी प्रमाणात खाल्ली तर त्याचं काही नुकसान होत नाही. मात्र हे प्रमाण वाढलं तर मात्र शरीराला मोठा अपाय होऊ शकतो.रोज 6 चमचे साखर जर तुमच्या पोटात गेली तर ते हानिकारक नसणार आहे. पण सातवा चमचा तुमचा घात करू शकतात.

जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढणं, ह्रदयासंबंधी आजार,कोलेस्ट्रॉल पातळीत मध्ये वाढ झाल्यास अल्झायमर सारख्या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे आता जर साखर जास्त खाणाऱ्यांमध्ये तुम्ही येत असाल तर सतर्क व्हा.

स्नायूंचे दुखणे आणि गुडघेदुखी

जर तुम्ही गुडघेदुखी किंवा हात पाय दुखण्याच्या कुठल्याही समस्येने हैराण असाल तर याचं कारण कदाचित अती गोड खाणं असू शकत.इतकंच नाही तर शरीरात गोडाचं प्रमाण वाढलं तर मोतीबिंदू,मेमरी लॉससारखे आजार बळावू शकतात.

शरीरात ग्लुकोजची पातळी कमी जास्त होते

ग्लुकोज तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण करते, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी योग्य ठेवण फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही गोड खाता तेव्हा स्वादुपिंड पेशींमध्ये ग्लुकोज आणण्यासाठी इन्सुलिन सोडते, ज्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. आणि मग हे चक्र संपल्यानंतर, तुम्हाला उर्जेची पातळी कमी झाल्यासारखे वाटते कारण तुमचे शरीर अधिक साखरेची डिमांड करते.

स्किनसंदर्भात तक्रारी

साखरेचा समावेश असलेले पदार्थ इन्सुलिनची पातळी वाढवतात आणि ग्लायकेशनची प्रक्रिया सुरू करतात.जसे ग्लुकोज तुमच्या रक्तात मिसळते त्यामुळे जळजळ आणि त्वचा रोग होऊ शकतात. हे इंसुलिन त्वचेतील तेल ग्रंथींची ऍक्टिव्हिटी वाढवून जळजळ होण्याची प्रोसेस ऍक्टिव्ह होते.

About विश्व भारत

Check Also

भूमि आंवला आयुर्वेदिक औषधीय अनेक प्रकार की बीमारियो को करती है ठीक

भूमि आंवला आयुर्वेदिक औषधीय अनेक प्रकार की बीमारियो को करती है ठीक टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

पोटाचा घेर कमी करायचा? तर ‘या’ झाडाला आजच घरी लावा

वजन कमी करण्यासाठी असा करा…! हेल्थलाइननुसार, आंब्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, वनस्पती संयुगे, पॉलिफेनॉल, टेरपेनॉइड्स इ. प्रतिकारशक्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *