Breaking News

नागपुरात बाळ तस्करीचा पर्दाफाश!18 पेक्षा अधिक बाळांची विक्री, सूत्रधार अटकेत

बाळाची तस्करी करणाऱ्याला नागपुरातून अटक करण्यात आली आहे. या रॅकेटची सूत्रधार आयशा खान ऊर्फ श्वेताने अटकेतील रेखा अप्पाजी पुजारी (वय 54, रा. निर्मल कॉलनी) या महिलेच्या माध्यमातून आतापर्यंत 18पेक्षा अधिक बाळांची विक्री केली, अशी धक्कादायक आहे.

रेखाला पाच दिवसाची पोलिस कोठडीत असून, गुन्हेशाखा पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत. सखोल चौकशीनंतर बाळविक्रीचा आकडा वाढू शकतो. माहितीनुसार, आयशा खान ही धंतोलीतील हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना बाजूलाच एका हॉस्पिटलमध्ये रेखा ही परिचारिका होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी दोघींची ओळख झाली. आयशा व नंतर रेखानेही काम सोडले. रेखा ही विश्वासू असल्याने आयशाने तिला आपल्या रॅकेटमध्ये सहभागी केले. आर्थिक दुर्बल महिलांना शोधण्याचे काम रेखावर सोपविले.रेखा ही महिलांचा शोध घेऊन त्यांना पैशांचे आमिष दाखवायची. कोराडी येथे राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेलाही तिने पैशांचे आमिष दाखविले. नवजात बाळाला गुजरातमधील धनाढ्य दाम्पत्याला देण्याचे आश्वासन तिला दिले. प्रसूतीदरम्यान रेखा ही तीन दिवस महिलेसोबत होती. रेखानेच आयशाला हॉस्पिटलमध्ये बोलाविले. बाळाला तिच्या स्वाधीन केले. मात्र, आयेशाने बाळ गुजरातमधील दाम्पत्याला न देता अन्य दाम्पत्याला विकले. याबाबत महिलेला माहिती मिळाली. तिने गुन्हेशाखा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रेखा, डॉ. नीलेश रामबहादूर मौर्य (वय 37), सचिन पाटील, आयशा खान ऊर्फ श्वेता सावले व मकबूल खानविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. तर रेखाला अटक केली आहे.

About विश्व भारत

Check Also

बाथरूम के अंदर CRPF जवान ने खुद को मारी गोली : मचा हड़कंप

बाथरूम के अंदर CRPF जवान ने खुद को मारी गोली? कैंप में मचा हड़कंप टेकचंद्र …

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप

पुलिस ने रेप पीड़िता को 15 दिन घुमाया : SP से शिकायत होते मचा हड़कंप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *