कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. राज्यात 226 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 926 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर माहीम भागात रुग्ण वाढल्याचं महापालिकेने सांगितले. देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. राज्यात पंचसूत्री राबवण्याच्या सूचना आता केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून सतर्क राहण्याचे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निर्देश दिले. चाचणी, पाठपुरावा, उपचार, मास्क, लसीकरणाची अंमलबजावणी कऱण्याचे निर्देश देण्यात आलेत. रूग्णसंख्या अधिक असलेले भाग शोधून तिथे आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात 668 कोरोना रूग्ण आढळले आहेत.
त्यामुळे बाहेर फिरताना काळजी घ्या, शक्यतो मास्क लावूनच फिरा असं आवाहन करण्यात आले. तर नागपुरात त्याचबरोबर H3N2 influenza याचेही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्ययंत्रणा सतर्क झाली आहे.