Breaking News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा स्वामिनी सावरकर यांचे निधन

Advertisements

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा तसेच हिंदुमहासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कै. विक्रमराव सावरकर यांच्या अर्धांगिनी स्वामिनी सावरकर यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सावरकरभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.

Advertisements

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा आयुष्यभर जपत त्यांनी विक्रमराव सावरकर यांनाही त्यांच्या संघटन कार्यात साथ दिली. प्रज्वलंत या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले. मुरबाड (ठाणे) येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या उभारणीत तसेच संस्थेचे कार्यात त्यांचा कायम सक्रीय सहभाग राहिला. विक्रमराव सावरकर यांच्या युद्ध आमुचे सुरु (नवी आवृत्ती- मनःस्वी) तसेच कवडसे या पुस्तकांसाठीही त्यांनी सहभाग दिला. यशोगीत सैनिकांचे हे पुस्तक त्यांनी नुकतेच लिहिले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवरील कार्यासाठी त्या नेहमीच प्रोत्साहित करत असत.

Advertisements

स्वामिनी सावरकर या पूर्वाश्रमीच्या मंदाकिनी गोखले होय. नागपूर येथील पांडुरंग गोखले परिवारात त्यांचा १८ डिसेंबर १९३९ या दिवशी जन्म झाला. त्यांचा विवाह नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव यांच्यासमवेत झाला. पृथ्वीराज आणि रणजित अशी त्यांची दोन मुले असून पृथ्वीराज यांचे नुकतेच निधन झाले तर रणजित हे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्य़क्ष आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला : नंतर काय झाले… वाचा

पुण्यातील तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कासारी फाटा रस्त्याने जाणार्‍या एका इसमाच्या धावत्या दुचाकीवर बिबट्याने …

विदर्भात उद्यापर्यंत ढगाळ वातावरण : तीन दिवसांत तापमान वाढेल

राज्यात सोमवार, अर्थात 20 मार्चपासून विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाळी वातावरण कमी होणार आहे. विदर्भात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *